आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा

आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट काम करत होतं. आर्यनवरील कारवाई ठरवून केली गेलीय. या प्रकरणात पूजा ददलानी, सॅम डिसोझा, मनिष भानुशाली आणि मास्टर माईंड सुनील पाटील यांच्यात 100 टक्के डील झाली होती, असा दावा पगारे यांनी केलाय. इतकंच नाही तर आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडे यांचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारल्यावर विजय पगारे यांनी टीव्ही 9 मराठीला महत्वाची माहिती

आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडेंचा संबंध आहे का?; विजय पगारे यांनी केला मोठा खुलासा
समीर वानखेडे, विजय पगारे
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 8:54 PM

मुंबई : मुंबई ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणात रोज नवीन आणि खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या विजय पगारे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठे गौप्यस्फोट केले आहेत. आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट काम करत होतं. आर्यनवरील कारवाई ठरवून केली गेलीय. या प्रकरणात पूजा ददलानी, सॅम डिसोझा, मनिष भानुशाली आणि मास्टर माईंड सुनील पाटील यांच्यात 100 टक्के डील झाली होती, असा दावा पगारे यांनी केलाय. इतकंच नाही तर आर्यन खान डील प्रकरणाशी समीर वानखेडे यांचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारल्यावर विजय पगारे यांनी टीव्ही 9 मराठीला महत्वाची माहिती दिलीय. (Sameer Wankhede involved in Aryan Khan deal case? Vijay Pagare’s sensational claim)

आर्यन खान प्रकरणात झालेल्या डीलमध्ये समीर वानखेडे यांचा संबंध आहे का? असा प्रश्न विचारल्यावर त्याबाबत मी खात्रीशिरपणे काही सांगू शकत नाही. पण भानुशालीने बोलता बोलता एकदोन वेळा समीर वानखेडेंचं नाव घेतलं होतं. वानखेडे साब से बात हुथी क्या, वानखेडे साहबसे बात हुई थी क्या असं तो बोलत होता, असं विजय पगारे यांनी सांगितलं.

विजय पगारे नेमकं काय म्हणाले?

मी सुनील पाटीलला 18 लाख दिले नाही. तर 35 लाख दिले आहेत. 20 लाख माझे आहेत आणि 15 लाख माझ्या मित्राचे आहेत. ठाण्याचे जितू सर म्हणून आहेत. आम्ही दोघांनी मिळून दिले. रेल्वेत कपडे पुरवणे, यूनिफॉर्म देणे आदी काम तो आम्हाला मिळवून देणार होता. 7 मार्च रोजी तो आम्हाला या कामासाठी दिल्लीलाही घेऊन गेला होता. रेल्वे बोर्डात विनयकुमार यादव यांना भेटायला गेलो होतो. आम्ही दिल्लीत रेल्वे कार्यालयात गेलो. त्यावेळी आम्ही खाली होतो. तो एकटाच वर गेला होता.

त्याच्याकडे लोक कागदपत्रं घेऊन यायचे. काही फॉरेनचे लोक कोविड लससाठी त्याच्याकडे आले होते. त्यावेळी पाटील मला ताजमध्ये घेऊन गेला होता. या परदेशी लोकांची कामे मीच करून देत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. या लोकांकडून पैसे आल्यावर मी तुला देतो असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे पैसे मिळाल्याशिवाय सोडायचं नाही हे मी ठरवलं होतं. जेवढे मिळतील तेवढे घ्यायचे, बाकी बुडाले तरी चालेल, पण पैसे घ्यायचे असं मी ठरवलं होतं.

फोनवर बोलताना तो भाऊ म्हणून हा शब्द वापरायचा तो सुनील पाटीलसाठी. हिंदीत आणि गुजरातीत तो कुणाशी बोलत होता ते माहीत नाही. चौकशी केली तर ते कळेल. मला त्यातील माहीत नाही. पण पूजा, श्याम आणि मयूर हे नाव घेत होता. केपी गोसावीने कुछ झोला तो नही किया, अपने को चुना तो नही लगाया असंही तो म्हणत होता.

‘भानुशालीने एक दोन वेळा समीर वानखेडेंचं नाव घेतलं होतं’

भानुशालीने बोलता बोलता एकदोन वेळा समीर वानखेडेंचं नाव घेतलं होतं. वानखेडे साब से बात हुथी क्या, वानखेडे साहबसे बात हुई थी क्या असं तो बोलत होता. त्यानंतर ३ तारखेला मी ठाण्याहून किल्ला कोर्टला गेलो. त्यापूर्वी मी माझ्या मित्राच्या रुमवर गेलो. तिथे टीव्हीवर मी पाहिलं तेव्हा टीव्हीवर या दोघांचे (भानुशाली आणि गोसावी) फोटो दिसत होते. तेव्हा हे काही तरी मोठं रॅकेट असल्याचं जाणवलं,. मी माझा मित्रं जितू सरांनाही हे सांगितलं. आपले पैसे बुडाले तरी चालतील पण महाराष्ट्रात मोठं रॅकेट घडत असल्याचं मी जितूला सांगितलं. ६ वाजेनंतर आर्यन खानला हजर करणार होते. त्यामुळे आम्ही किल्ला कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलं. माझं चित लागत नव्हतं. आठ सव्वा आठला मी गेलो. तिथे पोलीस आणि मीडिया मोठ्या प्रमाणावर होते. पोलिसांना विनंती करून आम्ही आत गेलो. कोर्टाचं काम सुरू होतं. कोर्टाच्या खाली दोन गाड्या उभ्या होत्या.

‘गोसावीच्या सेल्फीमुळे डील रद्द झाली’

सुनील पाटीलने 5 तारखेला मला तो विषय सांगितला. ते केपी गोसावीबरोबर बोलत होते. केपी पैसे परत कर म्हणून सांगत होते. केपी म्हणाले. माझ्याकडून काही पैसे खर्च झाले. 38 लाख पाठवून दिले. चार पाच लाखाची व्यवस्था करतोय, ते पाठवून देतो असं केपी गोसावी म्हणाले. सुनील संतापून बोलत होते. तुझ्या सेल्फीमुळे आणि तुझ्या चरबीमुळे संपूर्ण डील फेल झाली. तुला सेल्फीची चरबी चढली होती. तुझ्या सेल्फीमुळे आपले 18 कोटी गेले. माझे काय हाल झालेत, मी काय भिकारी झालो. माझ्या समोर देणेकरी बसलेत. मला पैसे द्यायचे आहेत. तुझ्यामुळे सेल्फीमुळे संपूर्ण डिल कॅन्सल झाली, असं सुनील पाटील हे केपी गोसावी बोलत होते.

इतर बातम्या :

सुनील पाटीलला क्रुझ ड्रग्ज पार्टीची माहिती होती, पाटीलने सॅम डिसूजाला दिली होती माहिती; कंबोज यांचा दावा

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर

Sameer Wankhede involved in Aryan Khan deal case? Vijay Pagare’s sensational claim

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.