Sameer Wankhede : सत्यमेव जयते… क्लिनचीट मिळाल्यानंतर जात पडताळणी समितीचे समीर वानखेडेंनी मानले आभार

प्रदीप गरड

Updated on: Aug 13, 2022 | 2:46 PM

माजी मंत्री नवाब मलिक, मनोज संसारे, अशोक कांबळे, संजय कांबळे यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राविषयी काही आक्षेप घेतले होते. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत, असे म्हणत आज समितीने वानखेडे यांना क्लिनचीट दिली आहे.

Sameer Wankhede : सत्यमेव जयते... क्लिनचीट मिळाल्यानंतर जात पडताळणी समितीचे समीर वानखेडेंनी मानले आभार
समीर वानखेडे
Image Credit source: Twitter

मुंबई : सत्याचा विजय झाला, सत्यमेव जयते, असे समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले आहेत. ट्विट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे यांना क्लिनचीट दिली. त्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. मी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा (Caste scrutiny committee) खूप आभारी आहे, की त्यांनी खऱ्या गोष्टीला समोर आणले. यापुढेही माझी सत्यासाठी लढाई सुरूच राहील, असे ते म्हणाले आहेत. माझ्या मृत आईवर आरोप करण्यात आले. माझ्या फॅमिलीवर आरोप करण्यात आले. पण अशावेळीसुद्धा माझी फॅमिली माझ्यासोबत उभी राहिली. मी खूप भाग्यवान आहे की मला अशी फॅमिली भेटली. न्यायपालिकेवरही (Judiciary) माझा पूर्ण विश्वास आहे, मी एक शिस्तबद्ध अधिकारी आहे, असे समीर वानखेडे म्हणाले आहेत.

जात पडताळणी समितीने काय म्हटले?

समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नव्हते. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला, हे सिद्ध झालेले नाही. पण ते अनुसूचित जातीमधील आहेत, हे सिद्ध झाले आहे, असे जात पडताळणी समितीच्या अहवालात म्हटले आहे. वानखेडे हे जन्माने मुस्लीम असल्याचे मुद्दे 91 पानांच्या आपल्या अहवालामार्फत फेटाळले आहेत. समीर वानखेडे यांची जात नेमकी कोणती, ते मुस्लीम आहेत की दलित, याविषयी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शोध घेण्यात आला. तत्कालिन मंत्री नवाब मलिक यांनीदेखील हा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. पण आता वानखेडेंना क्लिनचीट मिळाली आहे.

वानखेडेंचा दावा

माजी मंत्री नवाब मलिक, मनोज संसारे, अशोक कांबळे, संजय कांबळे यांनी समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राविषयी काही आक्षेप घेतले होते. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे ते सिद्ध करू शकले नाहीत, असे म्हणत आज समितीने वानखेडे यांना क्लिनचीट दिली आहे. गेल्या वर्षी वानखेडे हे मुंबईतील नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे प्रमुख असताना हे संपूर्ण प्रकरण समोर आले होते. मलिक यांनी कॅबिनेट मंत्री असताना आपल्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा त्यावेळी उपस्थित केला होता, असा आरोप वानखेडे यांनी केला. कारण त्यांच्या टीमने मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI