AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandeep Deshpande: बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत संजय दिना पाटील करताय काय? त्या गाडीचा फोटो दाखवत संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल

Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: पत्रकारांना आर्वच्च भाषा वापरत धमकी दिल्याने खासदार संजय दिना पाटील सध्या अडचणीत सापडले आहेत. त्याचवेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि तो फोटो दाखवत खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Sandeep Deshpande: बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत संजय दिना पाटील करताय काय? त्या गाडीचा फोटो दाखवत संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल
बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत संजय दिना पाटील करताय काय?
| Updated on: Jun 26, 2026 | 10:39 AM
Share

Sandeep Deshpande on Sanjay Dina Patil: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सकाळीच संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत एक फोटो दाखवला. नाशिक येतील 10 कोटींच्या केबलचोरी प्रकरणातील हा आरोपी आहे का ? फरार आहे की कुठे आहे आणि तो खासदारासोबत काय करतोय असा खोचक सवाल त्यांनी विचारला. पत्रकारांना आर्वच्च भाषा वापरत धमकी दिल्याने खासदार संजय दिना पाटील सध्या अडचणीत सापडले आहेत. देशपांडे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

10 कोटींच्या केबलचोरी प्रकरणातील आरोपी?

संदीप देशपांडे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत एक फोटो दाखवलाय आणि 10 कोटींच्या नाशिक केबलचोरी प्रकरणातला हा आरोपी आहे का ? फरार आहे की कुठे आहे आणि तो खासदारासोबत काय करतोय असा प्रश्न त्यांनी विचारलाय. ही व्यक्ती कोण, तिच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का? नाशिकमधील केबल चोरीचा काही संबंध आहे का? ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी कुणाच्या नाववर आहे. ही व्यक्ती कोण आहे ती पोलिसांच्या रिकॉर्डवर आहे. असा सवाल करत त्यांनी याप्रकरणी पोलीस आणि गृहखात्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे.

वाय प्लस सुरक्षा अजूनही कशी ठेवली?

एक खासदार काल पत्रकारांना अर्वाच भाषेत शिव्या घालत होती. त्याची भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही.पत्रकारांना धमक्या देणे, कमिशनकरकडे तक्रार कर बघून घेईन अशी भाषा करणारे म्हणजे इथल्या लोकशाहीला शिव्या घालण्यासारखं आहे. त्याला वाय प्लस सुरक्षा का दिलेली आहे आणि अजून का ठेवलीय सरकारने ? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला.

एका अभिनेत्याकडून अपघात झाला तेंव्हा त्याच्या बॉडीगार्डने तक्रार दिली असा इतिहास आहे. संजय दिना पाटलाच्या सुरक्षारक्षाकडून तक्रार घेऊन त्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा.एक खासदार काल पत्रकारांना अर्वाच भाषेत शिव्या घालत होती. त्याची भाषा महाराष्ट्राला शोभणारी नाही.पत्रकारांना धमक्या देणे, कमिशनकरकडे तक्रार कर बघून घेईन अशी भाषा करणारे म्हणजे इथल्या लोकशाहीला शिव्या घालण्यासारखं आहे.रेल्वे भरती दरम्यान राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण दिले म्हणून त्यांची सुरक्षा काढून घेतली होती इथे तो नियम लागू होत नाही का ? त्यांचे अनेक फोटो फेसबुकवर आहे, ती व्यक्ती कोण आहे त्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा. जी व्यक्ती अशी वागत आहे त्याची सुरक्षा काढून घेतली पाहिजे होती. गँगच्या जीवावर कुणी धमक्या देऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

रोशन सुवर्णाचे तपासात असहकार्य

आरोपी रोशन सुवर्णाकडे एसी लोकलचा पास, रोज एसी लोकलने जाणारा रोशन सुवर्णा एसी लोकल चुकल्याने फर्स्ट क्लास डब्यात चढला होता. बारकोड लेबलिंगचे काम करणार रोशन सुवर्णा कार्गोपासून अंधेरी स्टेशनपर्यंत जाण्यासाठी त्याने रिक्षा केली होती त्या रिक्षावाल्यासोबतही त्याचे वाद झाले होते. त्याने उशीर झाल्यामुळे अंधेरी ते मीरारोडला जाण्यासाठी कैब बुक करण्याचे प्रयत्न केले होते मात्र पावसामुळे कॅब मिळाली नसल्याने लोकलने जाण्याचा निर्णय घेतला.आरोपी रोशन सुवर्णा तपासत सहकार्य करत नसल्याचा पोलिसांचा दावा असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार