विरोधकांसाठी भाजपने प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला…संजय राऊत यांचा दावा
पोलिसांची पथके आज लोढा यांच्या अनेक ठिकाणांवर छापा मारत आहे. त्यांना चार पेन ड्राइव्ह शोधायचे आहे. दोन सीडी आहेत. त्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे. त्यात जे आहे, ते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे.

हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झाली आहे. या हनी ट्रॅपमुळे १६ ते १७ आमदार आणि चार खासदार भाजपने आपल्याकडे वळवले. त्यांना सीडी दाखवली जात होती. ईडी, सीबीआय हा प्रकार वेगळा आहे. प्रफुल्ल लोढा हा व्यक्ती या हनी ट्रॅप मागे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लोढा यांचा फोटो आहे. त्या फोटोची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केली.
एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या…
संजय राऊत यांनी सांगितले की, पोलिसांची पथके आज लोढा यांच्या अनेक ठिकाणांवर छापा मारत आहे. त्यांना चार पेन ड्राइव्ह शोधायचे आहे. दोन सीडी आहेत. त्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे. त्यात जे आहे, ते गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनाही माहीत आहे. या प्रकारामध्ये तक्रारदार शक्यतो नसतो. परंतु दृश्यफल दिसत असते. या प्रकरणात संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते. आता ते स्वतःच ब्लॅकमेल होत आहेत. या प्रकरणाची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक आणि दिल्ली येथून हलली आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत.
फडणवीस खोटे बोलत आहेत…
देवेंद्र फडणवीस किती खोटे बोलत आहेत, हे त्यांना माहिती आहे. हनीट्रॅपच्या सूत्रधार त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. विजय वडेट्टीवार यांनी थोडी माहिती दिली आहे. यासंदर्भात पूर्ण माहिती मी देणार आहे. यासंदर्भात उद्याचा सामनाचा अग्रलेखात सर्व काही स्पष्ट होणार आहे. ही लोक वेश पलटून जात होते. त्यांना सीडी दाखवत होते, असा दावा राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, कायद्याची पदवी असणे म्हणजे आपण सुसंस्कृत झालो असे नाही. आडनाव फडणवीस असले तरी मनात भाव पाहिजे. एका मंत्री रमी खेळतात तरी त्याच समर्थन केल जात आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती झाली आहे.
