
Sanjay Raut on Bangladeshi Hindu: बृहन्मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी मुंबईतून बांगलादेशी नागरिकांना हुडकून देशाबाहेर हाकलण्यात येण्याची घोषणा केली. खासदार संजय राऊत यांनी याविषयीची माहिती देत मोदी सरकारवर सनसनाटी आरोप केला. बांगलादेशातील हिंदूंवर अन्वनीत अत्याचार सुरू आहेत. त्यांची दुकानं जाळण्यात येत आहे. कित्येक मंदिरं पाडण्यात आली आहेत याचे दाखले देत संजय राऊत यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2026) हिंदूंच्या कत्तलीसाठी बांगलादेशाला कोट्यवधी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मराठी माणूस हिंदू असल्याचे कळले
मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड केली आहे. त्यांचं मी अभिनंद करतो, भाजपला कळले, मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे. याच मराठी माणसाने देशात हिंदूत्वाचं रक्षण केले आहे. दबावापोटी भाजपला मराठी महापौर करावा लागला असे राऊत म्हणाले. रितू तावडे ह्या मुळ काँग्रेसच्या आहेत, त्यांचं स्वत:चं काही नाही. आरएसएसच्या कार्यक्रमात सलमान खान होता. गर्दी जमा करायला सेलिब्रिटी हवा होता का, फक्त नटाला आमंत्रण होते की यापुढे मुसलमानांना सुद्धा प्रवेश असणार आहे का हे मोहन भागत यांनी सांगावे. हिंदू मुस्लिम राजकारण करणारे हे संघाचे कार्यकर्ते होते. सलामन खान आमच्या व्यसपीठावर आला हे दाखवायचं होते का, असा सवाल त्यांनी केला.
केंद्रीय अर्थसंकल्पात बांगलादेशाला आर्थिक मदत
महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. घुसखोरांना हकलं पाहिजे, मात्र हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे.हिंदूवर अन्याय झाला त्यावर सत्ताधारी काही बोलणार आहे का? हिंदूंना मारणाऱ्यांना बांग्लदेशला मदत केले आहे, देशाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. हिंदूंची कत्तलीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून बांगलादेशाला आर्थिक मदत करण्यात आली आहे असा सनसनाटी आरोप संजय राऊतांनी केला. हिंदूंवर अन्याय करणाऱ्यांना मदत केली जातेय, हे महापौरांना जाऊन सांगा. उगाच हिंदू-मुसलमान करू नका, असे राऊत म्हणाले. राऊतांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विधान परिषद, राज्यसभेसाठी एकमेकांना मदत
तर विधान परिषद आणि राज्यसभेसाठी एकमेकांना मदत करावी लागेल असे मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे, त्यांनी पुन्हा परिषेदवर जावं ही आमची इच्छा आहे असे राऊत म्हणाले. सध्या संख्याबळ पाहता विधान परिषद आणि राज्यसभेसाठी राऊतांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.