Sanjay Raut: फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शाहांचे दोन पक्ष; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणापूर्वीच संजय राऊतांचे सर्वात मोठे वक्तव्य

Sanjay Raut on NCP Merge: सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या अनुषंगाने बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घाडमोडींवर खासदार संजय राऊत यांनी तोंडसूख घेतले आहे.

Sanjay Raut: फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शाहांचे दोन पक्ष; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणापूर्वीच संजय राऊतांचे सर्वात मोठे वक्तव्य
संजय राऊतांची टीका
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 10, 2026 | 11:32 AM

Sanjay Raut on Fadnavis-Shah: अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तोंडसूख घेतले. त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला.

सरकारमध्ये अमित शाहांचे दोन पक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात, अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं या अनुषंगाने चर्चा झाली असेल असा दावा राऊतांनी केला फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर त्यांनी टीका केली. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील सरकार अमित शाह चालवतात. . फडणवीसांच्या सरकारमध्ये अमित शाह यांचे दोन पक्ष एक शिंदे गट आणि एक अजित पवार गट असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.हे दोन्ही पक्ष अमित शाह यांनी स्थापन केले आहेत. अमित शाह हे सध्या तिहेरी भूमिकेत असल्याचे ते म्हणाले. तर त्याअनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेणं यात काहीच नाविन्य नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी जोपर्यंत अमित शाह अथवा फडणवीस काही बोलत नाही, त्यावर काय बोलणार असं ते म्हणाले. शिंदे गटही भाजपमध्ये विलीन होणार का, असे अनेक प्रश्न असू शकतात. अमित शाह यांचे दोन पक्ष सरकारमध्ये सामील आहेत, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना त्यांच्याशी चर्चा करावी लागते असा चिमटा राऊतांनी काढला. सुनेत्रा पवार यांच्या दिल्लीवारीवरही त्यांनी भाष्य केले. शरद पवार यांचं पक्षचिन्ह बेकायदेशीरपणे अजितदादांच्या पक्षाकडे आलेलं आहे. दिल्लीत येऊन त्यांना राष्ट्रवादीच्या मूळ प्रमुखांना भेटावं लागेल, अमित शाहांना भेटावं लागेल असे राऊत म्हणाले.

चंद्रपूरात सेनेची साथ कुणाला?

चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस दोन गटात विभागली गेली आहे. इथं भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेची रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपने उद्धव सेनेला सव्वा सव्वा वर्षांच्या महापौर पदाची ऑफर दिली आहे. त्यावर राऊतांनी विचार मांडले. एकवेळ विरोधी बाकांवर बसावं लागलं तरी चालेल पण भाजपला मदत होईल अथवा सत्ता स्थापन्यासाठी मदत होईल अशी कोणतीही भूमिका शिवसेनाला घ्यायची नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरमधील स्थानिक नगरसेवकांना स्पष्ट केल्याची माहिती राऊतांनी दिली.