AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी हा कार्यक्रम सुरु होताच लोकं टीव्ही बंद करायचे; 59 वर्षे चालला अन् बनला नंबर 1

भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात दूरदर्शनने अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणले. रामायण, महाभारत आणि शक्तिमान यांसारख्या मालिकांनी प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवले होते. मात्र, याच वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम असा होता, जो सुरू होताच मनोरंजनाच्या शोधात असलेले काही प्रेक्षक टीव्ही बंद करत असत. तरीही गेल्या 59 वर्षांपासून सुरू असलेला हा कार्यक्रम आजही आपल्या वेगळ्या विक्रमामुळे चर्चेत आहे.

एकेकाळी हा कार्यक्रम सुरु होताच लोकं टीव्ही बंद करायचे; 59 वर्षे चालला अन् बनला नंबर 1
krushi dharshanImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 3:25 PM
Share

भारतीय टीव्हीच्या इतिहासात दूरदर्शनने अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांसमोर आणले. रामायण, महाभारत आणि शक्तिमान यांसारख्या मालिकांनी प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवले होते. मात्र, याच वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम असा होता, जो सुरू होताच मनोरंजनाच्या शोधात असलेले काही प्रेक्षक टीव्ही बंद करत असल्याचं सांगितलं जातं. तरीही 59 वर्षांहुन अधिकचा काळ एका मालिकेने गाजवला. या कार्यक्रमाची सुरुवात 1967 मध्ये झाली होती. शेती, पिकांचे उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील बदल याबाबतची माहिती यातून दिली जाते. निवेदकांसोबत कृषी तज्ज्ञही सहभागी होऊन शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित विविध विषयांची माहिती देतात.

दूरदर्शनवरील काही मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तुलनेत याचा विषय पूर्णपणे वेगळा होता. त्यामुळे मनोरंजनासाठी टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांना त्यात फारसा रस नसे. मात्र, शेतकरी वर्गासाठी हा कार्यक्रम माहितीचा महत्त्वाचा स्रोत ठरला. शेतीतील नवीन पद्धती, तंत्रज्ञान आणि उत्पादनाशी संबंधित माहिती मिळत असल्याने ग्रामीण भागातील प्रेक्षकांमध्ये त्याचे महत्त्व कायम राहिले.

या कार्यक्रमाने एपिसोडच्या संख्येतही मोठा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत 16 हजारांहून अधिक एपिसोड प्रसारित झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात त्याची स्वतंत्र नोंद झाली आहे.

मनोरंजनापेक्षा माहिती आणि शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या या कार्यक्रमाने अनेक दशकांचा प्रवास पूर्ण केला आहे. बदलत्या काळानुसार शेतीतील आधुनिकता तंत्रज्ञान, पिकांची निगा आणि कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी यांची माहिती देण्याचे कामही सुरू राहिले. त्यामुळे दीर्घकाळ प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्याचे नाव आजही आवर्जून घेतले जाते.

Follow Us
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर...
एका दिवसासाठी मायकल जॅक्सन बनायचंय', रणवीर सिंगच्या प्रश्नानंतर सांगितलं रंजक गुपित
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले