AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांची मोदींवर खोचक टीका, म्हणाले, तेच आता पप्पू…

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर "पप्पू" अशी खोचक टीका केली आहे. राहुल गांधी देशाचे परराष्ट्र आणि आर्थिक धोरण सोप्या भाषेत समजावत असताना देवेंद्र फडणवीस खिल्ली उडवत असल्याबद्दल राऊत यांनी भाजपला घेरले. मोदींनीच कॉमेडीची सुरुवात केल्याचे सांगत, लोकशाहीत पंतप्रधानांवर टीका करण्याचा अधिकार असल्याचे राऊत यांनी ठामपणे मांडले.

संजय राऊत यांची मोदींवर खोचक टीका, म्हणाले, तेच आता पप्पू...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 11:08 AM
Share

राहुल गांधी देशातील तरुणांना देशाचं परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. त्याची देवेंद्र फडणवीस हे खिल्ली उडवत असतील तर याचा अर्थ भाजपवाले हादरले आहेत. त्यामुळेच ते राहुल गांधींना टार्गेट करत आहेत. खरं तर राहुल गांधी यांनी मोदींनाच पप्पू ठरवलं आहे. मोदी हे पप्पू आहेत, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

भारताच्या परराष्ट्र धोरणाची परिस्थिती काय आहे? गळ्यात पडणं हेच आपलं परराष्ट्र धोरण झालं आहे, ते राहुल गांधी यांनी सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे. परराराष्ट्र आणि आर्थिक धोरण हे विषय किचकट असतात. ते सामान्यांना कळत नाही. ते त्यांना सोप्या भाषेत सांगावे लागतात. राहुल गांधी ते सोप्या भाषेत सांगत आहेत. त्याची देवेंद्र फडणवीस खिल्ली उडवत असतील तर त्याचा अर्थ ते हादरले आहेत. राहुल गांधीना पप्पू ठरवण्यासाठी शेकडो कोटी खर्च केले. त्याच राहुल गांधींनी मोदींना पप्पू ठरवलं आहे. मोदी पप्पू आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून लोक मान-सन्मान करत आहेत. तर राहुल गांधी देशाचे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

कॅबिनेटमध्ये जोकरांची फौज

मोदींच्या वाढदिवशी दिवे पेटवण्याचा कार्यक्रम झाला. मोदींना आशीर्वाद दिले गेले. हा कॉमेडीच्या वरचा प्रकार होता. मोदी लोकसभेत आणि बाहेर अनेकांची कॉमेडीचे प्रकार करत होते. नेहरू, सोनिया गांधी, राहुल गांधींची कॉमेडी करत होते. तो काय प्रकार होता? लोकसभेतही कॉमेडी करत होते? देशाचा पंतप्रधान लोकसभेत कधी चिपळ्या वाजवतो का? तो काय प्रकार आहे फडणवीस? मोदी स्टँडअप कॉमेडियन आहेत. जॉनी लिव्हरच्याही पुढचे कॉमेडियन आहेत. तुम्हाला जोकर ठरवलं गेलं आहे. देशात दोन जोकर आहेत. महाराष्ट्रात तुमच्या कॅबिनेटमध्ये जोकरांची फौजच आहेत. फडणवीस त्यावर बोला, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.

फडणवीस, संयमाने घ्या

राहुल गांधी देशाचे नेते आहेत. विरोधी पक्षनेते आहेत. देशातील अंधभक्तांना देशाचं आर्थिक आणि परराष्ट्र धोरण कसं कोसळलं हे ते सांगत आहेत. विरोधी पक्षाला सोप्या भाषेत देशाचं धोरण सांगावं लागतं. कॉमेडी करण्याचा ठेका काही काय मोदींनी घेतला का? कॉमेडी कुणीही करू शकतं, असं सांगतानाच त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने घेतलं पाहिजे. त्यांना लवकर दिलीत जायचं आहे. त्यांना तिथे गेल्यावर या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. फडणवीस यांना त्यांच्या पत्नीने दवाखान्यात गेलं पाहिजे. ते कोणताही विषय समजून घेण्याच्या पलिकडे गेले आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही सोबत गेलं पाहिजे. फडणवीस यांना काय झालं ते पाहिलं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.

टीका करण्याचा अधिकार नाही का?

मिमिक्री करण्याची सुरुवात कोणी केली? त्याचे पायोनिअर मोदी आहेत. पंडीत नेहरूंची खिल्ली कोण उडवतं? इंदिरा गांधींवर टीका कोण करतं? सोनिया गांधींवर वाईट शब्दात टीका कोण करतंय? राहुल गांधींविरोधात तुम्ही कॅम्पेन करत होता, आता ते उलटलं आहे. पंतप्रधानांवर टीका करयाची नाही हे संविधानात लिहिलंय का? लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोकांमधून निवडून आला आहात. त्यामुळे लोकशाहीत तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा