AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरविंद केजरीवाल प्रकरणात कोर्टाची ईडी, सीबीआयला चपराक- संजय राऊत

गेल्या काही वर्षांत देशात डोंबारीचा खेळ सुरु आहे. त्यात अनेक विरोधकांना अटक केली आहे. गेल्या दहा वर्षांत घटनात्कम संस्था मोदी, शाहाच्या कठपुतली बाहुल्या झाल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना बहुमतावरुन जनतेने खाली खचले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल प्रकरणात कोर्टाची ईडी, सीबीआयला चपराक- संजय राऊत
sanjay raut
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 11:09 AM

शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर होती, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. त्यांची कोर्टाने मुक्ताता केली आहे. यापूर्वी माझी आणि अनील देशमुख यांची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली होती. या तिन्ही प्रकरणातून मोदी सरकार तपास संस्थांचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी करत आहे, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे जनतेने मोदी यांना बहुमत दिले नाही. आता हे सरकार टेकूवरचे सरकार आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मोदींचा योगा दहा वर्षांपासून देश पाहत आहे

राज्यात कोयता गँग सक्रीय आहे. या सरकारमध्ये त्यांना पाठिंबा देणारे लोक आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मोदी यांनी योगा केला. त्यांचा हा योगा देश पाहणार आहे. देश गेल्या दहा वर्षांपासून तेच पाहत आहे. मुख्यमंत्र्यांनी योगा केला. उपमुख्यमंत्र्यांनी योगा केला. चांगली गोष्ट आहे, असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला.

यामुळे केजरीवाल यांना अटक

अनिल देशमुख, संजय राऊत असो की अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडे जनता होती. अरविंद केजरीवाल यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे. अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांना यश मिळू दिले नाही, त्यामुळे खोट्या प्रकरणाची उभारणी करुन त्यांना अटक केली.

गेल्या काही वर्षांत देशात डोंबारीचा खेळ सुरु आहे. त्यात अनेक विरोधकांना अटक केली आहे. गेल्या दहा वर्षांत घटनात्कम संस्था मोदी, शाहाच्या कठपुतली बाहुल्या झाल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना बहुमतावरुन जनतेने खाली खचले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांचे शिवसेना उबाठाकडून आम्ही अभिनंदन करतो. त्याच्या सुटकेमुळे ईडी अन् सीबीआय सारख्या संस्थांना चपराक आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं
.. तर राजकारण सोडेल; अजित पवारांनी थेट सांगितलं.
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ
विमान दुर्घटनेतून रमेश विश्वास कुमार कसे बचावले? पाहा थरारक व्हिडीओ.
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली
वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना! भिंत खचल्याने अनेक वाहनं दबली.
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान
मंत्री शिरसाट यांच्या भेटीनंतर जरांगे यांचं मोठं विधान.
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद
मुंबईत मुसळधार; अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक
इंग्रजी माध्यमाच्या शाळेविरोधात अविनाश जाधव आक्रमक.
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत
कुंडमळा पूल अपघातात बाप-लेकाचा दुर्दैवी अंत.
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप
गोगावलेंची निवडणुकीपूर्वी आघोरी पूजा.. ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप.
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी
आपत्ती विभागाचा अहवाल, 24 तासांत 18 मृत्यू, रायगडला रेड अलर्ट जारी.
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरची ड्रॉनमधून टिपलेली दृश्य.