अर्थमंत्री निर्मला सितारमन मूर्ख बाई; नीट पेपरफुटीरून संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay raut : संजय राऊत यांनी नीटपेपरफुटीवरून सरकारवर टीका केली. यावेळी निर्मला सीतारमन यांच्यावर निशाणा साधला.

नवी दिल्लीत नीट पेपरफुटी, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरून विरोधी पक्षही आक्रमक झाला झाला आहे. विरोधी पक्षाकडूनही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. नीट पेपरफुटीवरून विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संसदेचं कामकाज 27 जुलैपर्यंत ठप्प झालं आहे. ठाकरे गटानेही नीट पेपरफुटीवरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. संजय राऊत यांच्याकडूनही सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. संजय राऊतांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यावरही टीकेची तोफ डागली. अर्थमंत्री निर्मला सितारमन मूर्ख बाई आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला.
मी पेपरफुटीचा फायदा घेतला, आणखी तयारी केली, त्यामुळे माझी कामगिरी सुधारली, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री सितारमन यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले, ‘निर्मला सितारमन या मूर्ख बाई आहेत. त्यांना देशाविषयी काय माहीत आहे. त्यांच्या देशाविषयी भावना काय आहेत? त्यांना काय कळतं? आम्ही त्यांच्या नवऱ्याशी बोलू. ते शहाणे आहेत’.
धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधताना राऊतांनी म्हटलं की, ‘पेपरफुटीतील मुख्यआरोपी हे धर्मेंद्र प्रधान आहेत. काल मोदी म्हणत होते की, आम्ही या प्रकरणात कठोर कायदा आणू. परंतु त्याआधी पेपरफुटीसंदर्भात एक कायदा आहे. त्यांची आधीचे भाषणे बघा. यातील प्रमुख आरोपी हे धर्मेंद्र प्रधान आहेत. त्यांचा राजीनामा हे आंदोलक मागत आहेत. तरुण मुलं मागत आहेत. त्यांचा राजीनामा हा विरोधीपक्ष देखील मागत आहे. त्यावर राहुल गांधी, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आंदोलन करत आहेत. सरकार त्यांना का वाचवत आहे? त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल’.
संजय राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल
‘देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची सुरक्षा वाढवली आहे. काही मंत्र्यांनी स्वत:चे वेगळे बॉडीगार्ड ठेवले आहेत. ठाण्यातील उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पाहा. जितका ताफा हा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा नाही. तरीही फडणवीसांनी त्यांची सुरक्षा वाढवली. हा त्यांच्या कारकिर्दीतील दूरदृष्टीचा निर्णय आहे. महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचं वातावरण बिघडलं आहे. सरकारविरोधी आहे. पदोपदी धोका आहे. त्यामुळे मंत्री, आमदार, खासदारांनी बाहेर फिरू नये. बाहेर वादळ घोंघावत आहे. वादळाशी खेळू नका. गद्दारांनी कोणताही धोका पत्करू नये. वातावरण चिघळलं आहे. मी मानवतेच्या भावनेने सांगत आहे. काही अघटीत घडू नये, त्यासाठी त्यांनी निर्णय घेतलाय. केंद्रात लष्कराची देखील मागणी केली पाहिजे. तुम्ही शिवाजी पार्क, पुणे आणि नाशिकमध्ये पाहिले असेल. त्यामुळे दिल्लीत फिरू नका. दिल्लीत गेल्यावर गडबड होईल. जनतेशी गद्दारी केली, त्यांना धोका आहे, असा सल्ला राऊत यांनी दिला.
‘जगदीप धनखड यांनी काही वेळा शेतकऱ्यांची बाजू घेतली होती. सरकारच्या निर्णयावर टीका केली होती. ते विरोधकांना भेटत होते. त्यांच्याशी चर्चा करत होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. आता सरकारविरोधात तरुण आंदोलन करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
