आतली बातमी, महाविकास आघाडीचं ठरलं! आता जागावाटपासाठी बैठक होणार नाही

महाविकास आघाडीची आज जागावाटपाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत नेमकं काय ठरलं, याबाबतची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

आतली बातमी, महाविकास आघाडीचं ठरलं! आता जागावाटपासाठी बैठक होणार नाही
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 9:22 PM

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीकडून मविआला 27 जागांची यादी देण्यात आली. त्यामुळे वंचितकडून 27 जागांचा प्रस्ताव दिला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. पण मविआच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. वंचितकडून 27 जागांसाठी प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडून फक्त इच्छा व्यक्त करण्यात आली आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे आजची बैठक ही जागावाटपाची शेवटची बैठक होती. यापुढे एकही बैठक होणार नाही. आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अंतिम बैठक होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“महाविकास आघाडीची आजची बैठक ही निर्णायकच झाली आहे. तीनही पक्षांचे प्रमुख नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत काय चाललंय याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दूरध्वनीवरुन सातत्याने घेत होते. जागावाटप अत्यंत सुरळीत पार पडलेलं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तीनही पक्षांत कोणतेही मतभेद नाहीत. वंचित बहुजन आघाडीचा आज जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव तुम्हाला दिसायला खूप मोठा कागद दिसत असला तरी त्यांनी गेल्या काही वर्षात काही मतदारसंघात काम केलं, त्यांनी त्या मतदारसंघाची यादी दिलेली आहे. त्याच्यावर आम्ही चर्चा करु. शेवटी आम्हाला सगळ्यांना या देशात लोकशाही, संविधान, वंचितांचं रक्षण करणं हा आमचा अजेंडा आहे”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

‘वंचितने 27 जागांचा फॉर्म्युला…’

“आम्ही सर्वांना सविस्तर प्रत्येक जागेवर चर्चा केली. कोण कुठे जिकेंल यावर चर्चा केली. जिंकणं महत्त्वाचं आहे. कोण किती जागा लढतंय याला महत्त्व नाही. प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा हीच भूमिका आहे. त्यांनी 27 जागांचा फॉर्म्युला अजिबात सांगितलेला नाही. इच्छा व्यक्त केलेली नाही”, असं राऊतांनी स्पष्ट केलं. “आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी महाराष्ट्रभरात आहे. पण शेवटी महाराष्ट्रात जागा 48च आहेत. त्या आम्हाला वाटून घ्यायच्या आहेत. ज्याची ताकद ज्या मतदारसंघात आहे त्यावर आम्ही चारही पक्ष चर्चा करतोय. या बैठकीत काँग्रेसचे अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते”, असं राऊत म्हणाले.

‘आता कोणतीही बैठक होणार नाही’

“आमच्याकडे वंचितच्या 27 जागांचा प्रस्ताव नाही. आम्ही फक्त जागावाटपावर बोलतोय. महाराष्ट्रात दोन दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. आता कोणतीही बैठक होणार नाही. याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडलेलं आहे. पुढे अजिबात बैठक होणार नाही. यापुढे शेवटची बैठक ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होईल. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली जाईल आणि तेव्हा जागावाटप जाहीर केली जाईल”, अशी माहिती संजय राऊतांनी यावेळी दिली.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.