Sanjay Raut: उद्धव सेनेचे आमदार फुटणार? संजय राऊतांचे मोठे वक्तव्य काय? शिंदेवर काय साधला निशाणा?
Sanjay Raut on Operation Tiger : सध्या ऑपरेशन टायगर 3.0 ची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले. काल उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती. त्याला किती आमदार होते हजर? राऊतांनी असा साधला निशाणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर...

Sanjay Raut on Operation Tiger : सध्या ऑपरेशन टायगर 3.0 पुन्हा चर्चेत आले आहे. सहा खासदार फुटून शिंदे सेनेत गेल्यानंतर आता 14 आमदार शिंदे सेनेत जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यावर भाष्य केले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री पदासाठी ते काय करत आहे यावरून त्यांनी भाष्य केले. तर राम मंदिर दान पेटी लुटी प्रकरणात सरकारला सणसणीत टोला हाणला.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा हट्ट
महाराष्ट्र आणि इतर भागात लूट करून त्यांना कोणतीही किंमत मोजून त्यांना या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी दिल्लीसाठी ते किंमत मोजायला तयार आहेत. हे मी ऑनरेकॉर्ड बोलत आहे. त्यातील 50 टक्के त्यांनी मोजली आहे. आता बघू काय होत आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या अलिकडे दिल्ली फेऱ्या वाढलेल्या असू शकतात. या पैशाच्या ताकदीपुढे देवेंद्र फडणवीस हतबल झालेले दिसत आहेत. हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर वाढवला भारतीय जनता पक्षानं. आता तो भस्मासूर फडणवीस आणि अमित शाह यांच्या मानेवर सुद्धा बसल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केला.
ऑपरेशन टायगर 3.0 होणार?
ऑपरेशन टायगर आमदार जाण्याची भीती आहे. काल शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 19 आमदार बैठकीला उपस्थित होती. एक आमदार परभणीचे राहुल पाटील , जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे मुंबईत येऊ शकले नाही. त्यांनी रितसर परवानगी घेतली. काल उद्धव ठाकरे यांनी कोणतेही भाषण, मार्गदर्शन केले नाही. आमदारांच्या भावना, त्यांचे विचार हे ऐकून घेतले. एसआयआरसंदर्भात काल चर्चा झाली. राम मंदिर लुटीचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आला. पक्ष प्रमुखांनी उचलेल्या मुद्दाचे सर्व आमदारांनी कौतुक केले. या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनाला उपस्थित राहावे. उद्धव ठाकरे यांनी 36 जिल्ह्यातील आमंत्रणं स्वीकारली आहेत. त्याची सुरुवात नागपूरपासून होत आहे. पहिल्यांदा मुंबईत आंदोलन झाले. पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे नागपूरमधून दुसरा टप्प्यात राम मंदिर लुटी विरोधात आंदोलन करतील. त्यानंतर पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर यासह राज्यात जाऊ. राम मंदिराची लूट कशी झाली हे घरोघरी जाऊन सांगू, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
ढगाला लागली कळं
मेट्रो गळत आहे, विधानभवन पण गळत आहे. लोकल गळत आहे. काल बघितलं वंदे भारत गळत होती. सगळंच गळतंय यायचं, ढगाला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं अशी या सरकारची अवस्था आहे.
चोराच्या जागी चोर आला
अनिल शुक्ला, चंपतराय यांची ट्रस्टवरून हाकलपट्टी झाल्यासंदर्भात आणि ज्या लोकांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे, त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. चोरांच्या जागी चोर आले असे म्हटले जात आहे. जे कोणी आता आलेले आहेत आता चंपतराय यांच्या जागी, बजरंग बागडा, ते कोणी असतील, न्यायमूर्ती जरी असतील. ते व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल होते. त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यांनी अनेक विषयात, प्रकरणात हात मारला आहे. म्हणजे त्यांना हात मारण्याची सवय आहे. अशा माणसाला चंपत राय यांच्या जागी महासचिव नेमून विहिपी, संघ आणि सरकारने कोणते पापक्षालनं केले. एक चोर गेला. दुसरा चोर आला. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. म्हणून राम मंदिर लुटीविरोधात आमचं आंदोलन सुरू राहिल. कारण मंदिराची लूट यापुढेही सुरूच राहणार आहे. मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी हे आहेत, ते काल पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत. हेच ते गिरी आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केली होती. ही यांची अक्कल. कोषाची लूट चालली हे त्यांना माहिती नाही. त्यांनी उत्तर देणे टाळले आहेत. गिरीश महाजन इकडचे चंपतराय आहेत. त्यांना नेमल्यास वाटच लागली, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.