Sanjay Raut: सोडा हो, हे तर भाजपा शक्ती बिल, संजय राऊतांचा मोदी सरकारला तो खणखणीत इशारा, नारी शक्ती वंदन विधेयक खरंच बहुमतानं मंजूर होणार?

Sanjay Raut on Nari Shakti Vandana Bill: ऐन पाच राज्यातील निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. त्यावरून अपेक्षेप्रमाणे राजकारण तापले आहे. विरोधी पक्षातून आता तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. आज सकाळच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर तोफ डागली आहे.

Sanjay Raut: सोडा हो, हे तर भाजपा शक्ती बिल, संजय राऊतांचा मोदी सरकारला तो खणखणीत इशारा, नारी शक्ती वंदन विधेयक खरंच बहुमतानं मंजूर होणार?
संजय राऊत, नारी शक्ती वंदन विधेयक
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 10:21 AM

Sanjay Raut on Nari Shakti Vandana Bill: पुद्दुचेरी, तामिळनाडू, केरळम, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यातील निवडणुकीच्या धामधुमीत केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. या विधेयकासह विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक केंद्र सरकारच्या एजेंड्यावर आहे. त्याचे टायमिंग आणि हेतूवर विरोधकांनी गहजब उठवला आहे. विरोधी पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधेयकाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आज सकाळच्या पत्रकार परिषदेत उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जहरी टीका करत मोठा इशारा दिला आहे.

हे भाजपा शक्ती बिल

नारी शक्ती वंदन विधेयक हे बिल सप्टेब 2023 मध्ये हे बिल मंजूर झालेले आहे. केंद्र सरकार देशाला फसवत आहे. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याविषयीसंदर्भात हे विधेयक मंजूर झालेले आहे. जनगणनेसंदर्भात काही महत्त्वाच्या चर्चा होत्या. 2011 च्या जणगणनेनुसारच हे बिल लागू होईल. त्यानंतर त्यासाठी मतदार संघाच्या पुनर्रचनेचे एक विधेयक आहे. बिल ऐतिहासिक आहे हे केंद्र सरकार म्हणतं आहे. जर खरंच बिल ऐतिहासिक असेल तर मग सध्याच्या व्यवस्थेतच ते द्या ना. त्यासाठी 800 पेक्षा जास्त खासदार मतदारसंघ निर्माण करून तुम्हाला हे बिल लादायचे आहे. पण हे बिल लागू करण्यासाठी मोदी सरकारला 2/3 बहुमत मिळणार नाही. हे बिल मंजूर होऊ शकत नाही. हे नारी शक्ती बिल नसून ते भाजपा शक्ती बिल आहे. हे भाजपा शक्ती बिल आम्ही संसदेत मंजूर होऊ देणार नाही, असा खणखणीत इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

निवडणुकीच्या तोंडावर बिल आणण्यामागे काय हेतू?

केंद्र सरकारचाच हा डाव आहे. पाच राज्यात निवडणुका असताना त्यांना हे बिल आणण्याची गरज नव्हती. जर तुम्हाला ऐतिहासिक बिल आणायचे होते. लोकशाही मजबूत करायची आहे. महिलांचा लोकशाहीतील सहभाग वाढवायचा आहे. पण द्रमुकच्या, तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार प्रचारात आहेत. त्यांना येता येणार नाही. पण सरकारचा हा गैरसमज आहेत की हे बिल बहुमताने मंजूर होईल. हे विधेयक बहुमताने मंजूर होणार नाही, असा ठाम दावा खासदार संजय राऊत यांनी केला.

मतदानातून नारी शक्ती वंदन विधेयक पाडणार

विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांवर समन्वयाचं काम आहे. त्यात उद्धव ठाकरे हे सुद्धा आहेत. उद्धव ठाकरे आणि ममता दीदींचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरे हे ममता दीदींशी बोलतील. खासदारांना व्हीप बजावणार आहे. सत्ताधारी पक्ष जर व्हीप बजावणार असतील. तर विरोधी पक्षांनी सुद्धा व्हीप बजावणार आहेत. मतदानातून हे बिल पाडलं जाईल, असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला.

Follow Us