AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | भाजपच्या माकडांच्या उड्या ते ईडी भाजपचा पोपट, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 35 महत्त्वाचे मुद्दे

‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा निशाणा संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या ईडी नोटिसीविषयी बोलताना साधला.

Sanjay Raut | भाजपच्या माकडांच्या उड्या ते ईडी भाजपचा पोपट, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 35 महत्त्वाचे मुद्दे
| Updated on: Dec 28, 2020 | 3:14 PM
Share

मुंबई : “गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखी हत्यारे वापरावी लागतात” असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बातचित करत भाजपवर हल्लाबोल चढवला. ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा निशाणाही त्यांनी साधला. (Sanjay Raut Press Conference on wife Varsha Raut receiving ED Notice)

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 35 महत्त्वाचे मुद्दे

1. आमच्यासाठी ED हा महत्त्वाचा विषय नाही 2. CBI, इन्कम टॅक्स, ED या संस्था एकेकाळी प्रतिष्ठित मानल्या जायच्या. ज्यांची कारवाई म्हणजे काहीतरी गंभीर वाटायचं 3. गेल्या काही दिवसांपासून एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं, हे लोकांनी गृहीत धरलंय 4. सत्तेतल्या राजकीय पक्षाला विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा अशा संस्थांची हत्यारं वापरावी लागतात 5. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे यांना नोटीस आली 6. माझ्या नावाचा गजर, प्रताप सरनाईक यांच्यासारख्या प्रमुख लोकांना जे सत्ता बनवताना होते, त्यांना दबावाला बळी पाडण्यासाठी कागदाचे गोळे पाठवतात 7. राजकारणात समोरासमोर लढायचं असतं. घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणारे नामर्दाची औलाद 8. असं कुणी करत असेल तर शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर देईल 9. आम्ही घाबरत नाही, घाबरण्याचे कारण नाही 10. जर कोणी काही केलं नसेल तर नोटीस येत नाही हे फडणवीसांचं वाक्य 11. नोटीशी येऊ द्या, नाहीतर काहीही येऊ द्या आम्ही नाही घाबरत 12. याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली 13. गेल्या महिन्यापासून ED आमच्यासोबत पत्रव्यवहार करत आहे, आम्ही त्यांना सगळी कागदपत्रं दिलेली आहेत 14. भाजपची माकडे आम्ही अनेक काळापासून पाहत आहोत, ते उड्या मारत आहेत 15. ED मध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही मिळत 16. भाजपचे तिघे जण ईडी कार्यालयात जाऊन कागदपत्र बाहेर काढतात, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत 17. गेल्या एका वर्षापासून भाजपचे काही हस्तक माझ्याशी भेटण्याचा प्रयत्न करत आहेत 18. महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका, मोहात पडू नका, हे सरकार पाडायचे आहे असं सांगण्यात आलं 19. मला धमकवण्याचाही प्रयत्न केला. आमचे जवळचे लोक, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 22 लोकांची यादी आहे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना राजीनामे घेण्याचे प्रयत्न करून सरकार पाडलं जाईल 20. प्रताप सरनाईक हे त्याचे टोकन आहेत 21. नोव्हेंबरमध्ये सरकार पडण्याची डेडलाईन होती 22. पण आता घरच्यांना नोटिसा पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न 23. नोटीस पाठवा, वा अटक करा पण सरकार पडणार नाही (Sanjay Raut Press Conference on wife Varsha Raut receiving ED Notice) 24. बायकांच्या पदाराआडून लढाई करण्याची खेळी तुमच्यावर उलटणार 25. 12 वर्षांपूर्वी शिक्षिका असलेल्या मध्यमवर्गीय स्त्रीला घर घेण्यासाठी मैत्रिणीकडून कर्ज घेतलं आणि तुम्ही नोटीस पाठवता? 26. भाजपचे अकाऊंट उघडा, HDIL ने 3 वर्षात भाजपला किती देणग्या दिल्यात हे आधी जाहीर करा 27. माझ्याकडे 20 कोटींचा हिशोब आहे. तुमच्यापैकी कोणाची संपत्ती 1600 कोटीने वाढली, त्याचा हिशोब मागा आधी 28. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही मी पण नाही. आम्ही कायद्याचे पालन करतो आम्हाला नियम माहीत आहे 28. पण तुमच्या चौकशा कोण करणार? तुमचे हिशोब कोण पाहणार? 29. मी तोंड उघडलं तर तर हादरे बसतील. तुमच्या संपत्तीचे मुलाबाळांचे हिशोब आमच्याकडे आहेत, पण आम्ही कुटुंबाला मध्ये आणणार नाही 30. करायचं झालं तर आम्हाला तुमचं वस्त्रहरण करावं लागेल 31. राजकीय सूडाबाबत असेल तर राजकीय उत्तर दिलं जाईल, हे प्रकरण तुम्हाला महाग पडेल 32. पत्नी उपस्थित राहणार का, हा निर्णय अजून घेतला नाही. निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. पवार साहेबांशी आणि पक्षप्रमुखांशी बोलणार 33. माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे त्याबाबत ईडी काय करणार हे लवकरच कळेल 34. जो उखाडना है उखाडो 35. ईडीच्या नोटीचा आदर करतो, भले तो भाजपचा पोपट असो

पाहा संपूर्ण पत्रकार परिषद :

संबंधित बातम्या :

ईडीचा धाक दाखवत 22 आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचा डाव; राऊतांचा मोठा आरोप

‘आम्ही लॉ मेकर, तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, संजय राऊतांचा हल्लाबोल’

(Sanjay Raut Press Conference on wife Varsha Raut receiving ED Notice)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.