मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपची तक्रार, तेव्हा तुम्ही झोपला होतात काय?; राऊत कडाडले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढले होते. त्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. (sanjay raut)

मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपची तक्रार, तेव्हा तुम्ही झोपला होतात काय?; राऊत कडाडले
संजय राऊत, शिवसेना खासदार

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपशब्द काढले होते. त्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याप्रकरणी भाजपचा समाचार घेतला आहे. या घटनेला पाच वर्षे झाली. त्यावेळी तुम्ही झोपला होता का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (sanjay raut raut attacks bjp over complaint against cm uddhav thackeray)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला फैलावर घेतलं. मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कुणी काय म्हटलं मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटलं नव्हतं का?, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ते विधान का केलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं. भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे.भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, तसं जाहीर करावं, असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं आहे.

तर आम्ही मोदींशी बोलू

महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असं सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही. आमच्याकडे कामं आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला. (sanjay raut raut attacks bjp over complaint against cm uddhav thackeray)

 

संबंधित बातम्या:

एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, संजय राऊतांनी पुन्हा नारायण राणेंना डिवचले

भाजप आमदार राहुल कुल यांना धक्का, साखर कारखान्याला जप्तीची नोटीस

मंदिर यही खुलवायेंगे… जन्माष्टमीपासून राज्यातील प्रमुख मंदिरांबाहेर आंदोलन करणार; भाजपच्या अध्यात्मिक आघाडीची घोषणा

(sanjay raut raut attacks bjp over complaint against cm uddhav thackeray)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI