Sanjay Raut : संसद ते विधानसभा…देवेंद्र फडणवीसांची नरेंद्र मोदींविषयीची ‘ती गर्जना’ अज्ञानाचा अतिरेक, संजय राऊत यांचं रोखठोक वक्तव्य

Sanjay Raut : संसद ते विधानसभा...देवेंद्र फडणवीसांची नरेंद्र मोदींविषयीची 'ती गर्जना' अज्ञानाचा अतिरेक, संजय राऊत यांचं रोखठोक वक्तव्य
देवेंद्र फडणवीस संजय राऊत नरेंद्र मोदी

रेंद्र मोदी यांच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील काळ्या पैशांवरुन जनतेला दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचा उल्लेख केल्यावरुन ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीका केलीय.

दिनेश दुखंडे

| Edited By: Yuvraj Jadhav

Dec 26, 2021 | 12:12 PM

मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरात शिवसेना नेते खासदार आणि कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना टोले लगावले आहेत. 1971 च्या बांग्लादेश विजयाचं स्मरण करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं विस्मरण झाल्याप्रकरणी संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. तर, नरेंद्र मोदी यांच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील काळ्या पैशांवरुन जनतेला दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचा उल्लेख केल्यावरुन ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी टीका केलीय.

इतिहास घडवणाऱ्यांना विसरुन नवा इतिहास घडवता येत नाही

1971च्या बांगलादेश युद्धात विजय मिळवून देणाऱ्या इंदिरा गांधींचे नाव सरकार घेत नाही. गोवा मुक्ती लढ्यात पोर्तुगीजांना हाकलून देणाऱ्या पंडित नेहरूंचे नाव आपले पंतप्रधान घेत नाहीत. देश घडविणाऱ्या, इतिहास रचणाऱ्यांची नावे टाळून नवा इतिहास घडवता येत नाही हे त्यांना कधी समजणार ?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

आज सगळेच मनोरे कोसळून पडताना दिसतात

पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, सरदार पटेल डॉ. आंबेडकर अशी टोलेजंग माणसे संसदेच्या सभागृहात कधीकाळी वावरत होती. तेव्हा लोकप्रतिनिधी कुत्रे किंवा माकडांप्रमाणे वागत नव्हते हे पहिले ; तर सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीही त्यावेळी पदाची आणि देशाची शान ठेवूनच वावरत होत्या हे दुसरे. आज सगळेच मनोरे कोसळून पडताना दिसत आहेत, असं मत संजय राऊत यांनी रोखठोकमधून व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीसांची ती गर्जना अज्ञानाचा अतिरेक

देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये भरू असे वचन मोदी यांनी दिलेच नव्हते. भास्कर जाधव व नितीन राऊत ही मंडळी खोटे बोलत आहेत अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी करावी हा विरोधी पक्षाच्या अज्ञानाचा अतिरेक आहे, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देवेंद्र फडणवीसांच्या त्या गर्जनेनंतर लोकांनी नरेंद्र मोदींची 15 लाखांची भाषण समोर आणली. 2014 पासून पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या इतर नेत्यांच्या नकलांचे व्हिडीओ देखील समोर आल्याचं संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं.

इतर बातम्या:

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ‘मन की बात’

PM Modi Mann ki Baat Live : 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशानं समर्थपणे केला: नरेंद्र मोदी

Sanjay Raut slam Narendra Modi and Devendra Fadnavis in Rokhthok of Saamana

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें