AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल; संजय राऊतांचा इशारा

आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांनी खुशाल उड्या माराव्यात. एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. यांना घरातच बाथरुममध्ये तोंड लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतो. (sanjay raut slams bjp over anil deshmukh arrest)

तर दिवाळीनंतर स्फोट होतील, टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल; संजय राऊतांचा इशारा
संजय राऊत, खासदार, शिवसेना
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 11:18 AM
Share

मुंबई: आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांनी खुशाल उड्या माराव्यात. एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. यांना घरातच बाथरुममध्ये तोंड लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतो, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे. आज ते हे सर्व पाहून टणाटणा उड्या मारत आहेत. पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, असा इशारा देतानाच पण करायचे का आम्ही? तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे का? असा सवाल राऊत यांनी केला.

हे क्रुर लोक आहेत

कारवाईसाठी फक्त एकनाथ खडसेंचे नातेवाईक आणि नवाब मलिकांचे जावई दिसतात का? इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? हे क्रुर लोकं आहेत. राक्षस गणातील लोकं आहेत. हे हिंदुत्वाचे नाव घेतात. पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाहीये. कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. 2024 नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा सज्जड दमही त्यांनी दिला.

अटकासटका केल्या तरी सरकार पडणार नाही

ज्या प्रकारे केंद्रीय यंत्रणा काम करत असल्याचं दाखवत आहेत ते सर्व राजकीय षडयंत्र आहे. प्रत्येकाच्या बाबतीत हे षडयंत्र रचलं गेलं आहे. मी सुद्धा हे भोगलं आहे. आमच्या कुटुंबाने भोगलं आहे. माझ्या पत्नीला त्रास देण्यात आला. कुटुंबाला त्रास दिला गेला. ज्यांच्यामुळे भाजपचं सरकार येऊ शकलं नाही त्या प्रत्येकाला त्रास दिला जात आहे. जे लोकं भाजपाच्या अमिषाला बळी पडत नाही, सरकार पाडण्यासाठी त्यांना त्रास दिला जात आहे. तुम्ही कितीही त्रास दिला आणि अटकासटका केल्या तरी तुमचं सरकार येणार नाही, असंही त्यांनी बजावलं.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका, अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार; आयकर विभागाची नोटीस

Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची आघाडी कायम

समीर वानखेडेंना चारित्र्याचं सर्टिफिकेट देणं भाजपचं काम नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

(sanjay raut slams bjp over anil deshmukh arrest)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.