देशभर चिता जळत आहेत, शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळा; संजय राऊतांचं विरोधकांना आवाहन

कोरोनाचा संसर्ग मोठा आहे. देशभर चिता जळत आहेत. (sanjay raut slams bjp over cheap politics on vaccination)

देशभर चिता जळत आहेत, शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळा; संजय राऊतांचं विरोधकांना आवाहन
Sanjay Raut
भीमराव गवळी

|

Apr 17, 2021 | 11:20 AM

मुंबई: कोरोनाचा संसर्ग मोठा आहे. देशभर चिता जळत आहेत. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळून टाका, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना केलं आहे. (sanjay raut slams bjp over cheap politics on vaccination)

संजय राऊत यांनी आज मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांना हे आवाहन केलं. मी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. पहिला संसद भवन परिसरात घेतला होता. आता मुलुंडच्या फोर्टिसमध्ये घेतला. लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

टीका नको, सहकार्य करा

यावेळी त्यांनी लसीकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी फटकारले. लसीकरणावर राजकारण करू नका. देशभरात कोरोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा आणि शहाणे व्हा. त्या चितेत राजकारण जाळा, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असंही ते म्हणाले.

राज्यात 63 हजार नवे रुग्ण

महाराष्ट्रात काल (16 एप्रिल) 63,729 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. राज्यात सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय कोरोना रुग्ण असून, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 37 लाख 03 हजार 584 झाली आहे. राज्यात काल 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 1.61% इतका झालाय. कालच्या दिवसात 45 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 30 लाख 04 हजार 391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 जण होम क्वारांटाईन आहेत, तर 25 हजार 168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील मृत्यू दर 1.61 टक्के

राज्यात आज 398 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. तर राज्यातील मृत्यू दर 1.61% एवढा झालाय. तसेच राज्यात आज 45,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झालेय. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,33,08,878 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 37,03,584 (15.89 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत, तर सध्या राज्यात 35,14,181 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत, तर 25,168 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (sanjay raut slams bjp over cheap politics on vaccination)

संबंधित बातम्या:

देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 692 नवीन रुग्ण, 1341 जण दगावले

कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेत जीवंत रहायचं तर काय खायचं? WHO ची ही लिस्ट वाचा

कोरोनाचा प्रसार हवेतून वेगाने, मेडिकल जर्नल लॅन्सेटचा पुराव्यांसह दावा

(sanjay raut slams bjp over cheap politics on vaccination)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें