AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: तर नवे उद्योग, उद्योजक कसे यशस्वी ठरणार?; संजय राऊतांचा रोखठोक सवाल

Sanjay Raut: महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील 15 पेक्षा जास्त राज्ये सध्या वीज टंचाईच्या अंधारात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.

Sanjay Raut: तर नवे उद्योग, उद्योजक कसे यशस्वी ठरणार?; संजय राऊतांचा रोखठोक सवाल
तर नवे उद्योग, उद्योजक कसे यशस्वी ठरणार?; संजय राऊतांचा रोखठोक सवालImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2022 | 7:30 AM
Share

मुंबई: विजेची तूट असलेल्या राज्यांची संख्या आठवडाभरात 10 वरून 15 वर गेली नसती. वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा (coal shortage) वाहून नेणाऱ्या मालगाड्यांची धावाधाव करावी लागली नसती आणि त्यासाठी 700 च्या आसपास रेल्वे प्रवासी गाड्या रद्द करून हजारो प्रवाशांना आगीतून फुफाट्यात टाकण्याची वेळ आली नसती. हा सगळा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असाच आहे. पंतप्रधान मोदी (pm narendra modi) यांनी शुक्रवारी सुरत येथील ‘ग्लोबल पाटीदार बिझिनेस समीट’ या कार्यक्रमात बोलताना सामान्यातील सामान्य कुटुंबातील तरुणही यशस्वी उद्योजक व्हावेत यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याची ग्वाही दिली. हे सगळे ठीकच आहे, पण केवळ कोळसा पुरवठ्याच्या अयोग्य नियोजनामुळे वीजनिर्मितीला फटका आणि देशाला वीज संकटाचा ‘झटका’ बसणार असेल, भारनियमनामुळे ‘एक दिवस उद्योग बंद’ ठेवण्याची वेळ राज्यांवर येणार असेल तर नवे उद्योग व नवे उद्योजक कसे यशस्वी होणार? ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न कसे पूर्ण होणार?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी हा सवाल केला आहे. गेल्या पावसाळ्यातच अनेक कोळसा खाणीत पाणी शिरल्याने उत्खननावर परिणाम झाला आणि भविष्यातील कोळसा टंचाईचा इशारा मिळाला होता. युक्रेन-रशिया युद्ध भडकणार याची पूर्वकल्पना जगाप्रमाणे आपल्यालाही होती. डिझेलच्या दरवाढीचा फटकाही कोळसा वाहतुकीला बसणार हे उघड होते. त्यात आयात कोळशाचे भाव राज्यांच्या आवाक्याबाहेर आहेत, याचीदेखील जाणीव केंद्राला असायला हवी होती. मात्र राज्यांनी कोळसा आयात करावा असे सांगून केंद्र सरकार शांत बसले. कोळशाच्या पुरवठ्यांसाठी केंद्र सरकार आज जी धावाधाव करीत आहे ती वेळीच केली असती तर आज देशाला बसलेला वीज संकटाचा ‘झटका’ तुलनेने कमी बसला असता, असंही राऊत म्हणाले.

अग्रलेखात आणखी काय?

  1. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील 15 पेक्षा जास्त राज्ये सध्या वीज टंचाईच्या अंधारात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. या संकटासाठी कोळशाची टंचाई हे मुख्य कारण आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी इंधन करकपातीच्या मुद्दय़ावरून बिगरभाजप राज्य सरकारांना अकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मग आता कोळशाच्या टंचाईचे खापरदेखील केंद्र सरकार राज्य सरकारांवरच फोडणार आहे का?
  2. वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही केंद्राचीच जबाबदारी आहे. कारणे काहीही असतील, पण आज या वीज पेंद्रांना कोळशाचा पुरवठा अनियमित होत आहे. तेथील कोळशाचा साठा संपत आला आहे. त्यामुळे अनेक राज्यांवर ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात वीज भारनियमन करण्याची वेळ आली आहे. असे सगळे पाणी डोक्यावरून गेल्यावर केंद्र सरकार आता कोळसा पुरवठय़ासाठी धावाधाव करीत आहे. रेल्वे खात्याने म्हणे कोळशाची वाहतूक करणाऱया मालगाडय़ांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. मात्र त्यामुळे आठवड्याला दररोज सुमारे 16 मेल-एक्प्रेस आणि पॅसेंजर गाडय़ा रद्द कराव्या लागल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेचा विचार केला तर 24 मेपर्यंत पॅसेंजर गाड्यांच्या जवळपास 670 फेऱया रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात 500 पेक्षा जास्त फेऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या आहेत.
  3. कोळसा वाहतुकीला प्राधान्य वगैरे ठीक असले तरी ‘तहान लागल्यावर विहीर खणण्याचा’ हा उफराटा कारभार रेल्वे प्रवाशांच्या मुळावर आला आहे. या प्रवासी फेऱ्या रद्द झाल्याने उन्हाळी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लग्न समारंभासाठी, पर्यटनासाठी ज्यांनी या काळात रेल्वे प्रवासाचे नियोजन केले असेल, आगाऊ रिझर्व्हेशन केले असेल त्यांनी आता काय करायचे?
  4. कोळसा नियोजनातील चूक तुमची आणि ती भोगावी लागते आहे सामान्य जनतेला. केंद्र सरकारने म्हणे कोळसा लोडिंगचे प्रमाणही वाढवले आहे. दररोज देशभरात 400 पेक्षा जास्त गाडय़ा लोड केल्या जात आहेत. वीजनिर्मितीमध्ये आलेला अडथळा दूर व्हावा पिंवा ही निर्मिती ठप्प होऊ नये यासाठी हा उपाय असला तरी आधी जखम होऊ दिली कशाला?

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?