AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut on ketaki chitale: हे नशेबाज लोक आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा; केतकी चितळेचं नाव न घेता राऊतांची टीका

Sanjay Raut on ketaki chitale: केतकीने मध्यंतरी आंबेडकरी समाजाविषयी चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे वारंवार अशी वक्तव्य करत असल्यामुळे त्यांना तात्काळ राज्यातून तडीपार करावे, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

Sanjay Raut on ketaki chitale: हे नशेबाज लोक आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा; केतकी चितळेचं नाव न घेता राऊतांची टीका
केतकी सीरियल क्रिमिनल, राऊतांचं स्पष्ट वक्तव्यImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2022 | 12:33 PM
Share

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( sharad pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याने वाद निर्माण झाला आहे. केतकी चितळेच्या (ketaki chitale) या पोस्टवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही केतकीवर नाव न घेता टीका केली आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करा. काही व्यक्ती हिमालया एवढ्या असतात. काही व्यक्ती सूर्याच्या तेजा इतक्या तळपत असतात. सूर्यावर थुंकलं किंवा हिमालयाच्या दिशेने तोंड वेंगाडून दाखवलं म्हणजे हिमालयाचं आणि सूर्याचं महत्त्व कमी होत नाही. हे नशेबाज लोक आहेत सगळे. यांना वेगळ्या प्रकारची नशा कोणी तरी चढवली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात, देशात प्रत्येक ठिकाणी असे क्षुद्र किटक असतात. खिडकी उघडली, हवा आली की असे किटक वाहून जातात, अशी टीका राऊत यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.

संजय राऊत यांनी यावेळी हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी आणि माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो. संसदेत मी हिंदीतच बोलतो. कारण देशाने माझं म्हणणं ऐकावं. हिंदी ही देशाची भाषा आहे. त्यामुळे या भाषेचा सन्मान व्हावा. एक भाषा, एक संविधान आणि एक विधान याचं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

केतकीला राज्यातून तडीपार करा… सचिन खरात

दरम्यान, अभिनेत्री केतकी चितळेंवर रिपाइं नेते सचिन खरात यांनीही टीका केली आहे. शरद पवार साहेब यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळे यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचे दिसत आहे, पवार हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर काम करून महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रवाहात आणण्याचे काम करत आहेत. यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. परंतु अभिनेत्री केतकी चितळे यांनी जी पोस्ट केली याची महिला आयोगाने दखल घ्यावी. केतकीने मध्यंतरी आंबेडकरी समाजाविषयी चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे वारंवार अशी वक्तव्य करत असल्यामुळे त्यांना तात्काळ राज्यातून तडीपार करावे, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

केतकी चितळे काय म्हणाली?

केतकी चितळेने फेसबुकवरून शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अरे तुरेच्या भाषेत पवारांवर टीका करण्यात आली आहे. केतकीची फेसबुक पोस्ट खालील प्रमाणे…

तुका म्हणे पवारा | नको उडवू तोंडाचा फवारा || ऐंशी झाले आता उरक | वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे | सतरा वेळा लाळ गळे || समर्थांचे काढतो माप | ते तर तुझ्या बापाचेही बाप || ब्राह्मणांचा तुला मत्सर | कोणरे तू ? तू तर मच्छर || भरला तुझा पापघडा | गप! नाही तर होईल राडा || खाऊन फुकटचं घबाड | वाकडं झालं तुझं थोबाड || याला ओरबाड त्याला ओरबाड | तू तर लबाडांचा लबाड || -Advocate Nitin Bhave

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.