AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे ‘ते’ दोघे कोण? महत्त्वाची अपडेट समोर

आता संजय राऊतांच्या घराची रेकी नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली होती, याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी सर्व माहिती दिली आहे.

संजय राऊतांच्या घराची रेकी करणारे 'ते' दोघे कोण? महत्त्वाची अपडेट समोर
sanjay raut
| Updated on: Dec 21, 2024 | 11:25 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आल्याचे प्रकरण नुकतंच समोर आले होते. या प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. संजय राऊतांच्या घराबाहेर दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा घातपाताचा कट असल्याचा आरोप खुद्द संजय राऊतांनीही केला होता. यानंतर पोलीस आणि संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली होती. आता संजय राऊतांच्या घराची रेकी नेमकी कोणी केली आणि कशासाठी केली होती, याची माहिती समोर आली आहे.

संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी काल त्यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्याचा आल्याचा आरोप केला होता. शुक्रवारी सकाळी भांडुपमधील संजय राऊत यांच्या ‘मैत्री’ या बंगल्याची दोन मोटरसायकलवरून अज्ञातांनी संशयास्पदरित्या तपासणी केली होती. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. आता या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी सर्व माहिती दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या पत्रात काय? 

संजय राऊत यांच्या घराबाहेर पाहाणी करणाऱ्या त्या चार व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करण्यासाठी आलेल्या असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांनी काल रात्री जारी केलेल्या आपल्या पत्रकामध्ये म्हटले की, “आज दिनांक २०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास विक्रोळी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल राऊत यांचे स्वीय सहाय्यक हितेश पटेल यांनी फोनद्वारे कळविले की, आमदार सुनिल राऊत यांच्या मैत्री बंगल्यासमोर सकाळी ०९.१५ च्या सुमारास दोन संशयित इसम मोटार सायकलवर येऊन त्यांच्या घराची रेकी करुन निघून गेले आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी सदर घटनेची सखोल चौकशी केली. यामध्ये आढळलेले की, हे चार इसम सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी आहेत. ते ईरिक्सन कंपनीकडून जीओ मोबाईल नेटवर्कचे नेटवर्क टेस्ट ड्रायव्ह करीत असल्याचे निष्पन्न झाले असून, तशी संबंधीत कंपनीकडून खात्री करण्यात आली आहे.”

दरम्यान या घटनेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आरोप केले होते. “भांडुपमधील त्यांचे निवासस्थानच नाही तर दिल्लीतील सामना कार्यालय आणि घरावरही पाळत ठेवण्यात आली होती. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नाही. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे”, असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला होता.

संजय राऊत यांची सुरक्षा काढली

संजय राऊत यांना महाविकासआघाडी सरकार असताना वाय प्लस सुरक्षा होती. त्यानंतर महायुती सरकार आल्यावर ही सुरक्षा काढली. आता संजय राऊत यांना साधी सुरक्षा आहे. संजय राऊत यांनी सांगितले की, यापूर्वी मला धमकीचे फोन आले होते. तसेच रेकी करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत म्हणाले, रेकी केली त्यावेळी घरात कोणीच नव्हते. परंतु रेकी करणारी दुचाकी ही उत्तर प्रदेश किंवा बिहारमधील असू शकते. तसे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...