AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : बाप बेटे जेल जायेंगे..अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे..राऊतांचं सोमय्यांवर खोचक ट्विट

किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. तर त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. तसेच सोमय्या यांच्या जामीनासाठी हायकोर्टात धाव घेणार असल्याचेही त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे.

Sanjay Raut : बाप बेटे जेल जायेंगे..अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे..राऊतांचं सोमय्यांवर खोचक ट्विट
किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2022 | 9:22 PM
Share

मुंबई : आयएनस विक्रांत (INS Vikrant) आरोप प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आज कोर्टाने मोठा झटका दिलाय. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. तर त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय होणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे. तसेच सोमय्या यांच्या जामीनासाठी हायकोर्टात धाव घेणार असल्याचेही त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) दोन्ही बाजुने एकमेकांवर तोफा डागत आहे. सोमय्यांच्या नॉट रिचेबल असण्यावरून आणि आता जामीन फेटाळण्यावरून संजय राऊत यांनी खोचक ट्विट केले आहेत. तर पत्रकार परिषद घेऊनही जोरदार हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे.

पुन्हा बाप-बेटे जेल जायेंगे…

शिवसेना खासदार संजय राऊतांनी सोमय्यांना उद्देशून ट्विट करताना, बाप बेटे जेल जायेंगे..अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे..अशी खोचक टीका केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना हा इशारा संजय राऊत देत आहेत. किरीट सोमय्यांवर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की भाग सोमय्या भाग, हा नवीन सिनेमा कश्मीर फाईल्स वाल्यांनी काढायला पाहिजे. गुन्हा केला नाही, घाबरत नाही, असं म्हणताय, कोर्टाला कायद्याला सामोरं जा म्हणता, मग कशाला पळताय, तुम्ही कायद्याचं पालन करण्याबाबत लोकांना ज्ञान देता ना, असे म्हणत त्यांनी पुन्हा हल्लाबोल चढवला आहे.

किरीट सोमय्या यांनी डबे भरले

तसेच आयएनएल विक्रांतच्या बाबतीत जो दळभद्रीपणा जो झाला, असा देशात कधीच झालेला नाही.ज्या विक्रांत युद्धनौकेमुळे पाकचा पराभव करु शकलो, पाकची फाळणी करु शकलो. कराची, चितगाव बंदरं बेचिराख करु शकते. अशा महाकाय युद्धनौका जतन करायला पाहिजे. स्मरणात राहिली पाहिजे, असं आम्हालाही वाटत होती. केंद्रात आम्ही राष्ट्रपतींना त्यासाठी भेटलो. या महाशयांनी पैशे गोळा करायला सुरुवात केली. यांचं 2013चं ट्वीट आहे. नुसते डबे नाही फिरवले यांनं तर त्याच्या सातशे अकरा असे मोठे मोठे डबे भरले गच्च, असा थेट आरोप राऊतांनी पुन्हा केला आहे.

Sanjay Raut : सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊत

Kolhapur North Assembly : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत पैशांचा पाऊस? पोलिसांना किती पाकीटं सापडली?

Gunratna Sadavarte : 1 कोटी 80 लाख रुपये कुठे गेले? सदावर्तेंनी एवढा पैसा का गोळा केला? कोर्टात घमासान

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.