AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊत

Sanjay Raut : किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्यावर आता भाजपने खुलासा केला पाहिजे. तो आता सांगतो मी पक्षाकडे पैसे जमा केले. मग 13 वर्ष झोपला होता का? आता किरीट सोमय्यांबरोबर भाजपला गुन्हेगार ठरवायचे का? हे आता सरकारला ठरवावे लागेल.

Sanjay Raut : सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊत
सोमय्यांबरोबर आता भाजपलाही गुन्हेगार ठरवायचे का? आता आघाडी सरकारनेच ठरवावं: संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 11, 2022 | 7:13 PM
Share

मुंबई: किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. त्यावर आता भाजपने खुलासा केला पाहिजे. तो आता सांगतो मी पक्षाकडे पैसे जमा केले. मग 13 वर्ष झोपला होता का? आता किरीट सोमय्यांबरोबर भाजपला (BJP) गुन्हेगार ठरवायचे का? हे आता सरकारला ठरवावे लागेल. तेव्हाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोण होते? खजिनदार कोण होते? हा सगळा तपासाचा भाग झाला. म्हणजे भाजप आणि सोमय्यांनी मिळून हा घोटाळा केला का? ही मन की बात लोकांच्या मनात आली तर काय कराल? मी म्हणत नाही. सोमय्यांनीच कोर्टाला सांगितलं. हा देशद्रोह आहे, असं सांगतानाच 13 वर्ष पैसा वापरला. त्याचा हिशोब भाजपला द्यावा लागेल. ते आता जातीलच पण त्यांनी भाजपचेही रहात बुडताना पकडले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला.

भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढला पाहिजे. जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणता, घाबरत नाही म्हणता, इतरांना त्याच्या भ्रष्टाचारावरून प्रश्न विचारता, कायद्याला कोर्टाला सामोरे जा म्हणता मग तुम्ही का पळता? तुम्ही कशाला पळता? कायद्याचं पालन करण्याचं ज्ञान देता मग कशाला पळता? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

असला दळभद्री प्रकार कधी झाला नव्हता

असला दळभद्री प्रकार देशात कधी झाला नव्हता. तुम्ही लोकांच्या देशाच्या भावनेशी खेळला. विक्रांत संदर्भात देशाच्या भावना तीव्र होत्या. ज्या नौकेमुळे पाकिस्तानाचा पराभव केला. ती एक महाकाय युद्धनौका जतन करावी आणि पुढील पिढीसाठी स्मारक व्हावं ही सर्वांची भावना होती. आम्ही सर्व याच मताचे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तीच भूमिका मांडली होती. आम्ही राष्ट्रपतींना एकत्रं भेटलो होतो. भाजपवालेही सोबत होते. तेव्हा पृथ्वाराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांना युद्धनौकेचं स्मारक करण्याची विनंती केली होती. दुर्देवाने ते झालं नाही, असं राऊत म्हणाले.

मै तो डुबूंगा लेकीन

भाजपकडे पैसे जमा केले असतील तर त्याची रिसीट पावती असेलच ना. भाजपने त्या पैशाचं काय केलं. विक्रांत वाचवण्यासाठी काय केलं? असे अनेक प्रश्न तपासातून पुढे येईल. सोमय्यांनी विक्रांत भंगारात टाकताना भाजपलाही डुबवण्याचा प्रयत्न केला. मै तो डुबूंगा लेकीन तुमको भी लेकर डुबूंगा. हे कोणाचे नसतात. हे चोर लफंगे कुणाचे नसतात. आज त्याच्यावर संकट आलं म्हणून ते भाजपला बुडवण्याचा प्रयत्न करत आहे. सोमय्या हा ब्लॅकमेलर आहे. तो माफिया टोळी चालवतो. तो ईडीच्या धमक्या देऊन पैसे काढतो. हे मोठं रॅकेट आहे. ईडीच्या कार्यालयात जाऊन करतात ते? त्याचाही मी लवकरच पर्दाफाश करेल. नशीब हे पैसे ईडीच्या अधिकाऱ्यांना दिले नाही हे सांगितलं नाही. ईओडब्ल्यूने थर्ड डिग्री लावली तर तेही तो सांगेल, असं राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या:

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, INS Vikrant प्रकरणात अडचणी वाढल्या

Gunratna Sadavarte : 1 कोटी 80 लाख रुपये कुठे गेले? सदावर्तेंनी एवढा पैसा का गोळा केला? कोर्टात घमासान

Maharashtra News Live Update : दिलासा नाहीच! सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला, अटक होणार?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.