शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या विद्यार्थीनीसह 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या विद्यार्थीनीसह 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थीसह जवळपास 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Feb 04, 2020 | 8:49 AM

मुंबई : वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थीसह जवळपास 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे (Sedition case for raising slogans). यामध्ये टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समधील (TISS) एका विद्यार्थीनीचाही समावेश आहे. उर्वशी चुडावाला असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. आरोपींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 50 जणावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम 124 A, 153 B, 34 आणि 505 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना उर्वशी चुडावाला या विद्यार्थीनीच्या सोशल मीडिया एकाऊंटवर एक स्क्रिनशॉट मिळाला आहे. यात शरजील इमामच्या सुटकेची मागणी करणारं पोस्टर शेअर केलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबईतील आझाद मैदानात क्विर प्राईड मार्च (QPM) नावाने LGBTQ समुहाने एक रॅली आयोजित केली होती. यात एका गटाने शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी या गटाशी संबंधित लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी रॅलीचं आयोजन करणाऱ्या आयोजकांचीही चौकशी केली आहे. आयोजकांनी संबंधित गटाला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः ही माहिती दिली.

Sedition case for raising slogans

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें