पालघर केमिकल कंपनी स्फोट : मृतांचा आकडा 7 वर, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ए. एन. के. फार्मा कंपनीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजता भीषण स्फोट (Palghar tara nitrate blast) झाला. या स्फोटामुळे 4 ते 5 किमीचा परिसर अक्षरश: हादरला.  या स्फोटातील मृतांचा आकडा आता 7 वर पोहोचला आहे.

पालघर केमिकल कंपनी स्फोट : मृतांचा आकडा 7 वर, एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ए. एन. के. फार्मा कंपनीत शनिवारी संध्याकाळी 7 वाजता भीषण स्फोट (Palghar tara nitrate blast) झाला. या स्फोटाने 4 ते 5 किमीचा परिसर अक्षरश: हादरला.  या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला. तर  7 कर्मचारी जखमी झाले. NDRF च्या पथकाकडून शोध मोहीम सुरु आहे. अजूनही एक मुलगी बेपत्ता आहे.

ए. एन. के. फार्मा ही कंपनी नव्यानेच सुरू होणार होती. या कंपनीच्या 3 मजली इमारतीचे काम सुरु होते. या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या 6 जणांचे कुटुंब याच इमारतीत राहात होते. मात्र, शनिवारी रात्री टेस्टिंग घेत असताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुंटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला. तर 2 लहान मुलींचा जीव वाचला. पण, या मुलींच्या आई-वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. कालच (11 जानेवारी) एक लिफ्टमन आपल्या मालकासोबत हिशोब करण्यासाठी इथे आला होता. त्याचाही यात मृत्यू झाला. त्याचा मृतदेह आज सकाळी 8 वाजता सापडला. आतापर्यंत या स्फोटात 7 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर एक मुलगी अद्यापही बेपत्ता आहे.

स्फोट हा इतका भीषण होता की याचा आवाज आजूबाजूच्या परिसरात दूरपर्यंत ऐकू आला. सुरुवातीला या परिसरात भूकंप झाल्याचा भास झाला. मात्र, नंतर एका कंपनीत स्फोट झाल्याचं स्पष्ट झालं. या स्फोटानंतर परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला होता.

या स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालघर तारापूर औष्णिक केंद्र, डहाणू, पालघर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरात वीजपुरवठा बंद केल्याने मृतदेह शोधण्यास आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अडथळे येत होते.

राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  प्रत्येकी 5 लाख रुपये घोषित केले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश प्रशासनाला दिले.

स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन होते.

मुख्यमंत्र्यांना स्फोटाची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले होते.

Published On - 8:00 am, Sun, 12 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI