संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?

संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज?
शरद पवार, उद्धव ठाकरे

या शक्तिप्रदर्शनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Sharad Pawar Angry)

Namrata Patil

|

Feb 23, 2021 | 9:31 PM

मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थकांनी वाशिममधील पोहरादेवी गडावर (Pohradevi crowd) गर्दी केली होती. या शक्तिप्रदर्शनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Sharad Pawar Angry Sanjay Rathod Poharadevi crowd)

संजय राठोड हे पहिल्यांदा माध्यमांसमोर आले होते. त्यामुळे गर्दी निर्माण झाली होती. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नियम पाळा असे आवाहन केले होते. तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली. जर आपण जनतेसाठी एक नियम लावत असू, तर अशापद्धतीने नेत्याने समर्थकांची गर्दी करु नये, असे मत शरद पवारांनी मांडले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते.

पोहरादेवी गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत अनेक बातम्या माध्यमात आल्या आहेत. या सर्व बातम्यांची उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. तसेच वाशिम जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना याचा अहवाल द्यावा, अशा सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

संजय राठोड नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशांनंतर स्वत: संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. “पोहरादेवी गडावर गर्दी झाली. पण मी दर्शनासाठी गेलो होतो. लोकं स्वत: हून तिथे आली. आजूबाजूच्या शहरातील लोकं तिथं आली. मुख्यमंत्र्यांना पूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे. मी सुद्धा सर्वांना गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं. सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा असं सांगितलं होतं. पण दहा दिवसांनंतर मी त्यांच्यात गेलो होतो. या दहा दिवसात ज्याप्रकारे प्रसारमाध्यमं, वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमे यांच्यामध्ये प्रचार झाला होता त्यामुळे स्वत:हून लोकं त्याठिकाणी आले. गर्दीबाबत लोकांना आवाहन केलं होतं. माझं काम सुरु आहे. मी दर्शन करुन आलो आणि जिल्ह्याची आढावा बैठक घेतली”, असे संजय राठोड म्हणाले.

महंतावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

दरम्यान वाशिम पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड येणार होते. त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून वाशिम पोलिसांनी येथील महंतांना नोटीस दिल्या होत्या. मात्र तरीही बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात पोहरादेवी येथे आल्यानं कायद्याचा भंग झाला. त्यामुळे मानोरा पोलिसांत या महंतावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासनाने याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.

(Sharad Pawar Angry Sanjay Rathod Poharadevi crowd)

संबंधित बातम्या :

नियम सर्वांना सारखेच, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश, संजय राठोड म्हणतात….

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें