भुजबळांना कोरोना, शरद पवारांकडून खबरदारी, पुढील सर्व कार्यक्रम रद्द!

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोना झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले पुढील कार्यक्रम रद्द केले आहेत.

भुजबळांना कोरोना, शरद पवारांकडून खबरदारी, पुढील सर्व कार्यक्रम रद्द!
Sharad Pawar
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 10:59 AM

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांचं सभा कार्यक्रम रद्द करण्याचं आवाहन आणि दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना कोरोना झाल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 मार्चपर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे. (Sharad Pawar cancel all further public events after Chhagan Bhujbal tested corona positive maharashtra)

गर्दी टाळून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सभा, आंदोलने किंवा सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 21 फेब्रुवारीला सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना त्यांनी सांगितल्या होत्या.

शरद पवार यांचं ट्विट

 छगन भुजबळ यांना कोरोना 

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. (Minister Chhagan Bhujbal tested Corona Positive) राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून 24 तासही उलटत नाहीत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी

राज्यातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सोमवारपासून राज्यात सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आलीय. तसंच कोरोना संसर्गाच्या या कठीण काळात अशा तत्सम कार्यक्रमांचं आयोजन करु नये, अशी तंबीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय आहे. आपल्याला काही गोष्टी पाळाव्याच लागतील. आता एक बंधन पुन्हा आपल्याला पाळावं लागणार आहे. आपल्याला एकत्र मिळून लढायचं आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल, ही सूचना कोरोना देतोय. लॉकडाऊन करायचा का मी पुढचे आठ दिवस पाहणार, लॉकडाऊन ज्यांना नकोय ते मास्क घालून फिरतील, हवाय ते विना मास्क फिरतील, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या 

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी 

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे लग्नबंधनात, विवाह सोहळ्याला शरद पवार, भुजबळांची उपस्थिती

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.