AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा भाजपविरोधात पहिल्यांदाच मोठा नारा; महात्मा गांधींच्या त्या घोषणेशी काय संबंध?

मुंबईमधील शिवाजी पार्कवर झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेमध्ये इंडिया आघाडीमधील दिग्गज नेत्यांनी भाषणे केलीत. शरद पवार यांनी आपल्या भाषणात पहिल्यांदाच भाजपविरोधात नारा दिला.

शरद पवार यांचा भाजपविरोधात पहिल्यांदाच मोठा नारा; महात्मा गांधींच्या त्या घोषणेशी काय संबंध?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 17, 2024 | 10:03 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. मुंबईमधील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन पार पाडलं. इंडिया आघाडीमधील पक्षांचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी पहिल्यांदाच भाजपविरोधात पहिल्यांदाच मोठा नारा दिला. शरद पवार यांनी महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात दिलेल्या नाऱ्याचा संदर्भ दिला. पवार यांनी नेमका कोणता नारा दिला जाणून घ्या.

काय म्हणाले शरद पवार?

1942 मध्ये महात्मा गांधी यांनी छोडो भारत, छोडो हुकूमतचा नारा दिला होता. आता याच शहरात छोडो भाजप आणि भाजपसे मुक्ती असा नारा देत निर्धार केला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. टीव्हीवर आपण एक खोटी गोष्ट ऐकली आहे. मोदींची गॅरंटी, ही गॅरंटी चालणारी नाही. खोटं आश्वासन देऊ त्यांनी आपल्याला वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला. पण आजपासून टीव्हीवर ही गॅरंटी दिसणार नाही. कारण निवडणूक आयोगाने ती रोखण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो, असं शरद पवार म्हणाले.

देशाची आज जी अवस्था आहे, त्यात बदल करण्याची गरज आहे. आपण सर्व मिळून हा बदल घडवून आणू शकतो. ज्या लोकांनी देशाला वेगवेगळी आश्वासने देऊन फसवलं. त्यांना दूर करण्यासाठी आपल्याला मतदानातून बाहेर करावं लागलं. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी देशावासियांना अनेक आश्वासने दिले होते. शेतकरी, दलित, महिला, आदिवासी आणि सर्वांना आश्वासने दिली. ती पूर्ण केली नाही. जे लोक आश्वासने देतात पण पूर्ण करत नाही, त्यांना दूर केलं पाहिजे. पुढच्या महिन्यात आपल्याला ती संधी मिळाली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मास्क आहे. मुखवटा आहे. बॉलिवूडचे अॅक्टर्स आहे त्यांना रोल दिला जातो. आज हे बोलायचं, उद्या ते बोलायचं. सकाळी समुद्राखाली जा, सी प्लेनमधून उडा. 56 इंचाची छाती नाही. खोकला व्यक्ती म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली. इंडिया आघाडीच्या शक्ती प्रदर्शनामध्ये  तेजस्वी यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, राहुल गांधीसह इतर नेत्यांनी आपल्या भाषणांमधून भाजपवर निशाणा साधला.

Follow Us
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष