AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिका निवडणुकांबद्दल शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले आमच्यापेक्षा उद्धव ठाकरे…

शरद पवार यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन महिन्यांत होण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुका अपरिहार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिका निवडणुकांबद्दल शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले आमच्यापेक्षा उद्धव ठाकरे...
sharad pawar uddhav thackeray
| Updated on: Jun 20, 2025 | 11:34 AM
Share

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता निवडणुका घेणे अपरिहार्य असून, येत्या तीन महिन्यांत निवडणुका लागण्याची शक्यता शरद पवारांनी वर्तवली आहे. यावेळी शरद पवारांनी महाविकासाआघाडीसोबत निवडणूक लढवणार की नाही, याबद्दलही भाष्य केले.

आता निवडणूक लावण्याशिवाय पर्याय नाही

शरद पवारांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महापालिका निवडणुकांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकांवर भाष्य केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत आम्ही अजून काही चर्चा केली नाही. आमचा अंदाज असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे आता निवडणूक लावण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे साधारपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. त्यात आम्ही सर्वजण सहभागी होऊ, असे शरद पवार म्हणाले.

आमची एकत्र लढण्याची इच्छा

यावेळी त्यांना इतर पक्षांसोबत चर्चा करण्याबद्दल विचारणा करण्यात आली. आमच्या इतर घटक पक्षाशी आम्ही चर्चा केलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेली शिवसेना आहे. आम्ही एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरी जाता येईल का, याबद्दल चर्चा करु. पण आमची एकत्र लढण्याची इच्छा आहे, असे शरद पवारांनी सांगितले.

मुंबईत उध्दव ठाकरे प्राबल्य

यावेळी शरद पवारांनी विशेषतः मुंबईच्या संदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्राबल्य मान्य केले. “मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंचे शक्तीस्थान जास्त आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल,” असे शरद पवारांनी नमूद केले. मुंबईतील जागेवाटपात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल असे संकेत दिले. महाविकासआघाडी म्हणून काही चर्चा झालेली नाही. पण मुंबईत आमच्या सर्वांपेक्षा उद्धव ठाकरेंचे शक्तीस्थान जास्त आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागले, असेही शरद पवारांनी म्हटले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी