AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : 16 हजार किट, 250 डॉक्टरांचं पथक, राष्ट्रवादीची पूरग्रस्तांना मदत, दौरे टाळण्याचं नेत्यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पत्रकार परिषद घेत आहेत. राज्यातील तुफान पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार संवाद साधत आहेत.

LIVE : 16 हजार किट, 250 डॉक्टरांचं पथक, राष्ट्रवादीची पूरग्रस्तांना मदत, दौरे टाळण्याचं नेत्यांना आवाहन
sharad pawar
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 12:04 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना पक्षाकडून मदत जाहीर केली. राज्यातील तुफान पावसाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी संवाद साधला. राज्यात आलेल्या महापुराने शरद पवार चिंतातूर आहेत. महापूर आणि दरडी कोसळल्याचं चित्र पाहून शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी संवाद साधला.

शरद पवार काय म्हणाले? 

राज्याला पुराचा मोठा फटका बसला. या पुरामुळे घरांचं, शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेलंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण गावात अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी सरकार आणि जनतेच्या मदतीने गाव पुन्हा उभं केलं. पुनर्वसन कसं करतात त्याचं उदाहरण आहे.

16 हजार किट वाटणार

राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून मदत देणार. 16 हजार किट तयार करणार. यामध्ये घरगुती भांडी, दोन प्लेट, दोन पेले, दोन वाट्या, दोन शिजवायची भांडी, एक तवा, एक चमचा, पोळपाट लाटणे असं किट राष्ट्रवादीने तयार केलं आहे. ते 16 हजार कुटुंबाला देणार.

कोरोना प्रतिबंध मास्कही वाटप केले जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचा वैद्यकीय विभाग आहे, त्यांची 250 डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात जाऊन तपासणी करतील, औषधं देतील. गंभीर आजारी रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार केले जातील. अडीच कोटीच्या आसपास याची किंमत आहे.

रायगडची जिल्हाधिकारी – सुनील तटकरे रत्नागिरी – शेखर निकम, संजय कदम सिंधुदुर्ग – अजित सावंत सातारा – बाळासाहेब पाटील आणि विक्रमसिंह पाटणकर सांगली – जयंत पाटील

नुकसानग्रस्त भागाचे दौरे टाळा 

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे, अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे असे दौरे टाळावे.

मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले.

कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही.

दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो. ठिक आहे‌ राज्यपाल जात आहे त्यांचे केंद्राचे संंबंध‌ चांगले आहेत‌ ते‌ जास्त मदत आणू शकतात. केंद्रातून मदत मिळवून देण्यासाठी राज्यपालांचा उपयोगा व्हावा, असं शरद पवार म्हणाले.

पुराने मोठं नुकसान

शरद पवार राज्यावर आलेल्या पूर परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये आलेल्या पूरामुळे शेतकरी, कष्टकरी, उद्योजकांचं मोठं नुकसान झालंय आहे. त्यामुळे या भागात स्वत: शरद पवार जाण्याची शक्यता आहे. पूरग्रस्त भागांचा ते आढावा घेऊ शकतात.

दरड कोसळणे, त्यासोबत ओल्या दुष्काळातून बाहेर कसे पडावे यासाठीही ते सरकारला काही महत्वाच्या बाबी सूचवण्याची शक्यता आहे. राज्यासाठी केंद्राकडून भरीव मदद मिळण्यासंदर्भातही ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

LIVE TV – शरद पवार यांची पत्रकार परिषद 

संबंधित बातम्या 

अजित पवारांचा कोल्हापूर दौरा, शिरोळमध्ये पाहणी, पंचगंगा पुलावरुन आढावा, व्यापाऱ्यांशी चर्चा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.