AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : शरद पवारांनी ओबीसींचं आरक्षण बुडवलं, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल सुरूच, अजितदादांविरोधात पुन्हा उघडला मोर्चा

Laxman Hake attack on Sharad Pawar : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा पवार काका-पुतण्यांवर निशाणा साधला. शरद पवार यांनी ओबीसी आरक्षण संपवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तर अजित पवारांविरुद्ध ही त्यांनी नव्याने मोर्चा उघडला.

Sharad Pawar : शरद पवारांनी ओबीसींचं आरक्षण बुडवलं, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल सुरूच, अजितदादांविरोधात पुन्हा उघडला मोर्चा
अजित पवार, शरद पवार, लक्ष्मण हाके
| Updated on: Aug 17, 2025 | 12:21 PM
Share

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा पवार काका-पुतण्यांना लक्ष्य केले. पवार कुटुंबियांविरोधात हाके सातत्याने बोलत आहेत. विशेष म्हणजे अजित पवार महायुतीत असतानाही हाके त्यांच्याविरोधात बोलत आहेत. त्यामुळे हाके यांना नेमकी फुस कुणाची आहे, याची जोरदार चर्चा सुरू आहे. लक्ष्मण हाके केवळ पवारांविरोधातच का बोलत आहेत, असा प्रश्न विचारल्या जात आहेत. त्यामागे त्यांचे काय लॉजिक आणि मॅजिक आहे, यावर राज्यात खल सुरू आहे.

त्यांनी ओबीसी आरक्षण संपवलं

शरद पवारांची भूमिका ओबीसींना आवडलेली नाही. मंडल यात्रा प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर टीका केली.ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवारांचा हा प्रकार सुरू आहे. शरद पवारांनी ओबीसींचे आरक्षण संपवलं, अशी जळजळीत प्रतिक्रिया हाके यांनी दिली. शरद पवारांची ही भूमिका ओबीसी समाजाला अजिबात आवडलेले नाही. शरद पवार हे दुतोंडी मांडुळासारखे वागतात. शरद पवार यांनीच महाराष्ट्र मधील ओबीसीचे आरक्षण संपवल आहे. त्यांनीच मनोज जरांगे यांना रसद पुरवली आहे, असा गंभीर आरोप हाकेंनी केला. शरद पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे’ नाव घेऊन ओबीसींचा आरक्षण बुडवले, असा आरोप त्यांनी केला.

अजितदादांवर टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार हे जातीवादी नेते आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार,कारखानदार यांचे नेते असल्याचे म्हणत ते जातीयवाद करत असल्याचा आरोप हाकेंनी केला. पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. अजितदादा पवार यांचा महाज्योती संदर्भातील सामाजिक दुजाभाव मी वारंवार महाराष्ट्राला सांगितला आहे. अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारे व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय काहीही माहित नाही. पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत असतं म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो, असे लक्ष्मण हाके म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे या केवळ वडिलांच्या मायलेज वर निवडून येतात. त्यांचं संसदेत काय काम आहे? म्हणून त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांचे प्रश्न कधी संसदेत मांडले आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.

राज्यात मराठा-ओबीसी वाद भडकणार

महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी देते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत, असा आरोप हाकेंनी केला.

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या