संजय राठोडांवर कारवाई व्हायला हवी का? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणतात…

संजय राठोडांवर कारवाई व्हायला हवी का? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला म्हणतात...
Sharmila Thackeray_Raj Thackeray_ Sanjay Rathod

Marathi Language Day : शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना यावेळी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

सचिन पाटील

|

Feb 27, 2021 | 11:47 AM

मुंबई : जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त (Marathi Language Day) शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) सपत्नीक उपस्थित राहिले. मनसेच्या मुंबईतील या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी हजेरी लावून, मराठीत सही केली. तसंच मराठी सहीची मोहीमच एकप्रकारे सुरु केली. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनीही विविध विषयावर भाष्य केलं. (Sharmila Thackeray comment on Maharashtra minister Sanjay Rathod at shivaji park mns Marathi Language Day program)

शर्मिला ठाकरे यांना यावेळी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारताय आम्ही सरकारमध्ये नाही पण, महिला म्हणून अशा प्रकरणामध्ये कारवाईची गरज आहे असं वाटतं”

तसं पाहिलं तर राज्यात अनेक अत्याचाऱ्याच्या घटना घडतात, सगळीकडे कारवाईची गरज आहे. हे प्रकरण लावून धरल्यामुळे खास करुन मीडियाचे आभार, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

विनामास्क राज ठाकरेंची हजेरी

दरम्यान, या कार्यक्रमाला राज ठाकरे हे विनामास्क आले होते. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बहुतेकांनी मास्क लावलेला होता. परंतु राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. साहजिकच कॅमेरे राज ठाकरे यांच्यावर खिळले. पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असं छेडलं असता, ‘मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

VIDEO : शर्मिला ठाकरे काय म्हणाल्या? 

संबंधित बातम्या 

मास्कबद्दल प्रश्न, राज ठाकरे म्हणाले, कोरोना इतकाच वाढत असेल तर निवडणुकाही पुढे ढकला!

मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय; राज ठाकरे यांनी ‘दादू’चं ऐकायचंच नाही, असं ठरवलंय का? 

(Sharmila Thackeray comment on Maharashtra minister Sanjay Rathod at shivaji park mns Marathi Language Day program)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें