AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाला कायमचे दरवाजे बंद?, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान काय?

येत्या 13 जानेवारी रोजी मी कल्याण मतदारसंघात शाखांना भेटी देणार आहे. यावेळी मी भाषण करणार नाही. शाखेत येऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे येणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यावेळी काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाला कायमचे दरवाजे बंद?, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान काय?
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 07, 2024 | 3:30 PM
Share

निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 7 जानेवारी 2024 : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने ठाकरे गटात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलंच बळ मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आज पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. शिंदे गटातील एकाही व्यक्तीला या पुढे शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला आता उद्धव ठाकरे गटात कायमचा प्रवेश बंद झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रसिद्ध अभिनेते किरण माने आणि बीडमधील काही कार्यकर्त्यांना आज मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं. आपल्या घरात आल्यासारखं वाटतंय. पूर्वी शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहे, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित होते. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याची घोषणा केली.

ते खोक्यात बंद

तुमच्या भावना फार महत्त्वाच्या शब्दात मांडल्या. आपल्या घरात आल्यासारखं वाटतं असं मनोगत तुम्ही व्यक्त केलं. पण काही लोक भटकंतीला गेले. त्यांना परत घरात घेणार नाही. ते खोक्यात बंद झाले आहेत. त्यांना खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

तुम्ही आल्याने ताकद वाढली

राजेशजी तुमचं स्वागत करतो. शिवसेनेसारखं प्रेम कुठल्याही पक्षात मिळत नाही. म्हणूनच घरात आल्यासारखं वाटतं असं तुम्ही म्हणालात. शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा एक संवाद आहे. आज मेरे पास ये है, वो है… तुम्हारे पास क्या है? तुम्हाला सांगतो, आपल्याकडे शिवसैनिकांची माया प्रेम आणि जिद्द आहे. हिंमत आपुलकी विकली जात नाही, विकत घेता येत नाही. लढाई मोठी आहे. तुमच्या सारखे कट्टर एकवटले तर लढाई सोपी आहे. तुमच्या सारखे लोक आले तर डगमगता येत नाही. तुम्ही आलात आपली ताकद वाढली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. खोके घेणाऱ्यांनी पक्ष चिन्ह घेतलं तरीही त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. कारण उद्धव ठाकरे एकटा नाही. उद्धव ठाकरेंसोबत महाराष्ट्र आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.

काळाराम मंदिरात जाणार

मी काळाराम मंदिरात जाणार आहोत. राम मंदिरासाठी आपण भोगलंय. कोर्टाच्या आदेशाने स्वप्न पूर्ण होतंय. कोर्टालाही निर्णय द्यायला 25 ते 30 वर्ष लागली. भाजपचं सरकार आलं. पण राम मंदिरासाठी ते कायदा करू शकले नाही. कोर्टाच्या आदेशाने आता राम मंदिर होत आहे. त्याचा आनंद आहे. काळाराम मंदिरात जात आहोत. त्याचं वेगळंपण आहे. राम सर्वांचा आहे. राम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता. म्हणूनही त्याचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे मी तिथे जाणार आहे. गोदातीरी आरती करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.