“स्वतः काचेच्या घरात राहता, आणि दुसऱ्याच्या घरावर…”; शिंदे गटानं संजय राऊतांवर तोफ डागली

नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या तक्रारीवर बोलताना त्यांनी त्यांच्या तक्रारीची खिल्ली उडवली आहे. सुरक्षा व्यवस्था काढून घेतली गेली असल्याने त्यांनी हा स्टंट केल्याची टाकी त्यांनी केली आहे.

स्वतः काचेच्या घरात राहता, आणि दुसऱ्याच्या घरावर...; शिंदे गटानं संजय राऊतांवर तोफ डागली
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 5:24 PM

मुंबईः ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी त्याबाबतचे पत्र पोलीस आयुक्तांसह, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही दिलं आहे. त्यावरून आता राजकारण तापले आहे. संजय राऊत यांच्या या तक्रीरीनंतर विरोधकांनी त्यांच्या तक्रारीची खिल्ली उडवत संजय राऊत यांची ती फक्त स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे. त्यातच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीच्या काळातील त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्यात आल्याने ते अस्वस्थ झाले आहेत.

त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी राजा ठाकुरला दिली असल्याचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.

संजय राऊत यांनी तक्रार दिल्यापासून त्यांनी त्यांच्या तक्रारीची खिल्ली उडवण्याचं काम विरोधकांनी केले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तर त्यांच्यावर टीका करताना त्यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्याचा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असल्याचा घणागात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका करताना राज्यात सत्तांतर झाल्यापासून संजय राऊत यांचे डोकं फिरले आहे. त्यावेळेपासू ते वाटेल ते बडबड करत आहेत. त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून टाकली आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते वाटेल ते आरोप करत सुटले आहेत.

नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या तक्रारीवर बोलताना त्यांनी त्यांच्या तक्रारीची खिल्ली उडवली आहे. सुरक्षा व्यवस्था काढून घेतली गेली असल्याने त्यांनी हा स्टंट केल्याची टाकी त्यांनी केली आहे.

प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ज्या प्रमाणे टीका केली, त्याच प्रमाणे मंत्री शंभूराज देसाई यांनीही संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी चर्चेत राहण्यासाठी ही तक्रार केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांना पोलिसात बोलवून त्यांची रितसर तक्रार ऐकून घेऊन त्या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.