AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घरचा रस्ता दाखवला ना?’, उत्तर प्रदेशात दाखल होताच एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशात दाखल झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून टीका केली जातेय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. विशेष म्हणजे ते उद्या आपल्या भाषणात ठाकरेंवर टीका करण्याची शक्यता आहे.

'घरचा रस्ता दाखवला ना?', उत्तर प्रदेशात दाखल होताच एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 08, 2023 | 10:31 PM
Share

लखनौ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या सर्व आमदार-खासदार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. ते आज संध्याकाळी मुंबई विमानतळाहून लखनौच्या दिशेला रवाना झाले. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास लखनौला दाखल झाले. शिंदे यांचं अतिशय उत्साहात उत्तर प्रदेश सरकारकडून स्वागत करण्यात आलं. उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्री, तसेच भाजपचे नेते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आले होते. शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लखनौ विमानतळाबाहेर दाखल झाले होते. अतिशय वाजतगाजत एकनाथ शिंदे यांचं लखनौमध्ये स्वागत करण्यात आलं. लखनौमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावरही निशाणा साधला.

“खूप आनंद आणि समाधान आहे. तुम्ही वातावरण तर बघताय. संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. सर्व अयोध्या भगवी झाली आहे. हजारो कार्यकर्ते स्वागतासाठी आले आहेत. मी त्यांचा आभारी आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदा रामलल्लांच दर्शन घ्यायला येतोय. मी खूप समाधानी आहे. खूप आनंदी आहे. अयोध्या आणि रामलल्लांचं दर्शन हे राजकीय विषय नाहीत. श्रद्धा, भक्ती, भावना आणि अस्मितेचा विषय आहे. अयोध्या यात्रेचा कुणीही राजकीय अर्थ काढू नये. फक्त दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

एकनाथ शिंदे यांना आम्ही अयोध्या दाखवली, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात येतेय. यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. “त्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला. मी त्यावर उद्या सविस्तर बोलतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद देतो. त्यांचे मंत्री स्वागतासाठी आले आहेत. हजारो कार्यकर्ते स्वागतासाठी आले आहेत”, असंदेखील एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना रामलल्लांच्या दर्शनासाठी आलेत. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा आहे. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारच नाही, तर भाजपचे मंत्री आणि नेतेही शिंदेसोबत आहेत. गिरीश महाजन, संजय कुटे, मोहित कंबोज, राम शिंदेही शिंदेंच्या शिवसेनेसोबत आलेत. दुसरीकडे शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन, संजय राऊतांनी बोचरी टीका केलीय. महाराष्ट्रात केलेले पाप धुण्यासाठी शिंदे अयोध्येत जात असल्याचं राऊत म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेसह भाजपच्या नेत्यांनीही राऊतांचा समाचार घेतला.

शिंदेंचा 2 दिवसांचा दौरा आहे. शिंदे मंत्री आणि आमदारांसोबत आधी लखनौला मुक्काम करणार आहेत आणि नंतर अयोध्येत दाखल होतील. पण राऊतांप्रमाणंच आदित्य ठाकरेंनीही शिंदेवर निशाणा साधला. रावण राज्य चालवणारे अयोध्येला जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय.

शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, अयोध्येत खास तयारीही करण्यात आलीय. ठिकठिकाणी शिंदेंच्या स्वागताचे बॅनर लागलेत. शरयू नदीच्या किनारी स्वच्छता करण्यात आलीय. भगवान श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर शिंदे शरयू नदीची आरती करणार आहेत. पण ठाकरे गटाच्या पाठोपाठ अजित पवारांनीही शिंदेंना लक्ष्य केलं. रिक्षा चालवणारे अयोध्येला चाललेत, असं अजित पवार म्हणाले. याआधी शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते..आता प्रभू श्रीरामाचं दर्शन घेत आहेत..अर्थात हिंदुत्वाच्या ट्रॅक आम्हीच कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न शिंदेंचा आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.