उद्धव ठाकरेंना खूप मोठा झटका, शिवसेनेतील दिग्गज नेता शिंदे गटात सहभागी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आलीय.

उद्धव ठाकरेंना खूप मोठा झटका, शिवसेनेतील दिग्गज नेता शिंदे गटात सहभागी
Follow us
| Updated on: Nov 11, 2022 | 11:37 PM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी एक बातमी समोर आलीय. शिवसेनेचे दिग्गज खासदार आणि पक्षातील जुने-जाणते नेते गजानन कीर्तीकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ धरली आहे. मुंबईतील माहीम विधानसभा नागरिक सत्कार सोहळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित गजानन कीर्तीकर शिंदे गटात सहभागी होत आहेत. कीर्तीकर यांना ठाकरे गटातील एकनिष्ठ खासदार मानलं जात होतं. पण त्यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाच्या खासदारांची संख्या 13 वर पोहोचली आहे.

गजानन कीर्तीकर यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल होत एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता कीर्तीकर रविंद्र नाट्य मंदीर येथील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गजानन कीर्तीकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी कीर्तीकर यांनी शिंदेंच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. शिवसेना आणि भाजप हीच खरी युती, असं परखड मत गजानन कीर्तीकर यांनी मांडलं होतं.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गजानन कीर्तीकर यांच्या प्रवेशावर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय.

“आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, गजानन कीर्तीकर यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. गजानन कीर्तीकर हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे सहकारी होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आहेत. ते फार मोठे नेतृत्व आहेत. त्यांच्या प्रवेशाने आमची ताकद वाढणार आहे”, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली.

“गजानन कीर्तीकरांसारखा मोठा नेता बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतो, आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतो, यातून शिंदेंनी केलेला उठाव योग्य होता हे स्पष्ट झालंय”, असं उदय सामंत म्हणाले.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.