महापौरांनी सांगितला शिवसेनेचा मेगा प्लॅन; मुंबईतील मराठी तरुणांना रोजगार मिळणार

मुंबईत 65 ठिकाणी स्ट्रीट हब उभारले जाणार आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्ट्रीट हब सुरु असतील. | Mumbai street food

Rohit Dhamnaskar

|

Feb 09, 2021 | 3:22 PM

मुंबई: कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे मुंबईसारख्या शहरातही बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून विशेषत: मराठी तरुण-तरुणींसाठी एक मेगा प्लॅन आखण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज आहे. (BMC will planning street hubs in Mumbai)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटले की, मुंबईत 65 ठिकाणी स्ट्रीट हब उभारले जाणार आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्ट्रीट हब सुरु असतील. याठिकाणी स्ट्रीट फुडचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

या स्ट्रीट फूडमध्ये पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जाईल. यामध्ये मोदक, पुरणपोळी, पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, थालीपीठ यासारख्या पदार्थांचा समावेश असेल. त्यामुळे साहजिकच याठिकाणी मिळणाऱ्या स्ट्रीट फूडच्या माध्यमातून मराठी लोकांना मोठ्याप्रमाणावर रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

महानगरपालिकेचे विद्युतनिर्मिती क्षेत्रात पाऊल

मुंबई महानगरपालिकेने पहिल्यांदाच विद्युतनिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना तीन ते चार रुपये प्रति युनिट या दराने वीज मिळू शकते, असे महापौरांनी सांगितले.

लोकल पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासंदर्भात सध्या वेट अँड वॉच धोरण

सामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सुरु झाल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. मात्र, 31 मार्चपर्यंतची परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली होती.

महापौर किशोरी पेडणकेर यांनीही लोकलसंदर्भात वेट अँड वॉच धोरणाला एकप्रकारे दुजोरा दिला. लोकलच्या फेऱ्या वाढल्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल. इतर राज्यात अनेकवेळा लॉकडाऊन करण्यात आला. मात्र, आपल्याकडे तशी वेळ आली नाही, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा हळदी कुंकवावर भर; सत्तेची हळद लागणार का?

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीत द्या, आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

(BMC will planning street hubs in Mumbai)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें