ईडीचं पुन्हा समन्स, अमोल कीर्तिकर यांच्या अडचणी वाढल्या, माध्यमांसमोर येत म्हणाले…

ठाकरे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. ईडीने अमोल कीर्तिकर यांना पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीच्या या समन्सवर अमोल कीर्तिकर यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय.

ईडीचं पुन्हा समन्स, अमोल कीर्तिकर यांच्या अडचणी वाढल्या, माध्यमांसमोर येत म्हणाले...
ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 4:53 PM

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण अमोल कीर्तिकर यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावलं आहे. अमोल कीर्तिकर यांना कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमोल कीर्तिकर यांना लगेच काही वेळाने ईडीने समन्स बजावले होते. तसेच त्यांना आता पुन्हा ईडीने चौकशीचं समन्स बजावलं आहे. ईडीच्या या कारवाईवर अमोल कीर्तिकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “ईडीने मला पहिलं समन्स पाठवलं तेव्हा मी त्यांना बोलावलेल्यावेळी काही कारणास्तव येऊ शकत नाही, असा मेसेज पाठवला होता. तसेच का येऊ शकत नाही? याचंही कारण मी त्यांना सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी मला दुसऱ्यांदा बोलावलं आहे. मी काही चौकशी टाळत नाही. पण माझ्यावर दुसरीसुद्धा जबाबदारी आहे. मला पक्षानेदेखील जबाबदारी दिली आहे. त्या जबाबदारीला मी प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर मी ईडी चौकशीला सामोरं जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया अमोल कीर्तिकर यांनी दिली.

“समोर जे पक्ष आहेत त्यांना कुणालाही उमेदवारी द्यावी. तो त्यांचा अधिकार आहे. कुणीही येऊद्या. मी लढायला तयार आहे. माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी एकत्रपणे लढायला तयार आहेत”, असं अमोल कीर्तिकर म्हणाले. यावेळी अमोल कीर्तिकर यांना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कीर्तिकर यांनी सविस्तर भूमिका मांडली.

संजय निरुपम यांच्या आरोपांवर कीर्तिकर काय म्हणाले?

“तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात. ते आज म्हणतात की, मी गुन्हेगार आहे. जो काही गुन्हा त्यांनी दाखल केलाय त्यामध्ये संजय निरुपम यांनी माझं नाव दाखवावं. त्या माध्यमातून कुठलाही गुन्हा नोंदवला की, तपास होत असतो. चौकशी होत असते. ईडी, ईओडब्ल्यू नोटीस काढत असतात. त्यांना मी सहकार्य करत असतो. मी दोनवेळा ईडी कार्यालयातही चौकशीसाठी जाऊन आलो. मी त्यांना जे विचारलं ते सांगितलं. काय कागदपत्रे हवी होती ती दिली. त्यांनी माझी चौकशी केली. माझा जबाब नोंदवला. मी सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे दिली आहे. या वेळेला माझ्यावर एक पक्षाची जबाबदारी होती. मला देवाच्या कामासाठी गावी जायचं होतं. तसं मी त्यांना कळवलं होतं. त्यांनी मला वेळ दिली आहे. मी नक्कीच पुढच्यावेळेला चौकशीसाठी जाण्याचे प्रयत्न करेन”, असं अमोल कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.

‘फरार होण्याचा संबंधच येत नाही’

“प्रत्येकाला आपापलं मत मांडायचा अधिकार आहे. मी तुमच्या चॅनलसमोर आहे. तुम्ही वर्सोव्यात आहात. याचाच अर्थ मी माझ्या मतदारसंघातच फिरतोय. मग फरार होण्याचा संबंधच येत नाही. ईडीने बोलावलं तेव्ही मी नक्की जाईल. मी माझ्या वरिष्ठांचा सल्ला घेईन, माझ्या वकिलांशी बोलेन आणि चौकशीला जाईन”, असं अमोल कीर्तिकर म्हणाले.

‘कोण समोर आहे यापेक्षा…’

“मला माझ्या पक्षाने, महाविकास आघाडीने तिकीट दिलेलं आहे. मी लढणारच आहे. समोरचा उमेदवार कुठल्या पक्षाचा असेल हे त्या त्या पक्षाने निवडायचं आहे. समोरचा पक्ष जो कुणी उमेदवार देईल त्याच्यासमोर मी आणि माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आम्ही अत्यंत चांगल्याप्रमाणे लढत देणार आहोत. कोण समोर आहे यापेक्षा आपण लोकांकडे जावून काय मागतोय ते महत्त्वाचं आहे. मी कधीच कुणाबद्दल निगेटीव प्रचार केलेला नाही. मला जे करायचं आहे ते सांगणार आहे”, अशी भूमिका अमोल कीर्तिकर यांनी मांडली.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.