मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा उपक्रम, 1 जूनपासून मुंबईत सुरु होणार शिव योग केंद्रे

या योगा केंद्रांसाठी २५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबईत एकूण २०० शिव योगा केंद्र सुरु केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील १०० केंद्र सुरु होतील. यासाठी प्रशिक्षकांचे एक पॅनेलही तयार करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा उपक्रम, 1 जूनपासून मुंबईत सुरु होणार शिव योग केंद्रे
Mumbai ShivyogaImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 10:05 PM

मुंबई – मुंबईत (MUMBAI)आता १ जूनपासून नागरिकांना योगाचे (Yoga training)धडे दिले जाणार आहे. मुबंईत जीवनशैलेशी निगडीत आजारांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तकदाब, हृदयविकार तसेच नैराश्य यासारख्या आजारांचा समावेश होतो. औषधोपचारांसोबतच आरोग्यदायी जीवनशैली व योगासनांचा प्रचार व प्रसार झाल्या‍स त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये येत्या जून २०२२ पासून शिव योग केंद्रे (Shiv yoga center)सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी किमान ३० नागरिकांच्या समुहाने आपल्‍या विभाग कार्यालयाकडे निर्धारित पद्धतीनुसार अर्ज करणे अपेक्षित आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. योगाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाला दोन तासांचे एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

२०० केंद्र सुरु करणार

या योगा केंद्रांसाठी २५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबईत एकूण २०० शिव योगा केंद्र सुरु केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील १०० केंद्र सुरु होतील. यासाठी प्रशिक्षकांचे एक पॅनेलही तयार करण्यात येणार आहे.

शिव योग केंद्राचे ठळक मुद्दे

. इच्छुक नागरिकांच्या समुहासाठी समुह (गट) असेल. या सोबतच ज्या समुहाकडे शिवयोगा केंद्रासाठी खुली जागा, सभागृह, समाज मंदीर हॉल इत्यादींची सोय असल्यास ती ठळकपणे नमूद केल्यास त्यांना प्राधान्य.

हे सुद्धा वाचा

. ही जागा मोफत उपलब्ध होण्यारकरिता समन्वय करणे अथवा उद्यानातील मोकळी जागा, मैदान, शाळेचा हॉल अथवा समाज कल्याण केंद्र इत्यादी असे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येईल.

. शिव योग केंद्राची पूर्वतयारी, अंमलबजावणी व पर्यवेक्षणाची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य खात्याची असेल. ‌ . ज्या योग प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल, त्या संस्थेला सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत देण्यात आलेल्या महितीनुसार विभागवार योग केंद्रावर प्रशिक्षित व अनुभवी योग प्रशिक्षकाची नेमणूक करणे, ५ दिवस योग प्रशिक्षक उपस्थित राहील याची खबरदारी घ्यावी लागेल.

. संस्थेद्वारे नेमण्यात येणाया योग प्रशिक्षकाला नेमून दिलेल्या शिव योगा केंद्रावर नियमित व वेळेवर उपस्थित राहणे, योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असेल.

. किमान ३० नागरिकांच्या गटासाठी एक शिव योग केंद्रसुरू करण्यात येईल, एका गटाचा योग प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिन्यांचा असेल व प्रशिक्षणाचा कालावधी प्रति‍दिन १ तासाचा असेल. ५ दिवस सकाळी ०६.०० ते ०८.०० वाजेपर्यंत कार्यरत राहील.

. शिव योग केंद्रावर नवीन बॅचसुरू झाल्यानंतर १५ दिवसांनंतर ३० पेक्षा कमी सभासदाची उपस्थिती असल्यास महिना पूर्ण झाल्यानंतर योग केंद्र बंद करण्यात येईल.

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.