AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: शेंडी ठेवली म्हणजे हिंदूत्व नाही, दाढी ठेवली म्हणजे इस्लाम नाही, संजय राऊतांचं ट्विट चर्चेत

Sanjay Raut: माझं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. मंदिरात घंटा बडवणारे हिंदू नकोत. अतिरेक्यांचा खात्मा करणारे हिंदू मला हवे आहेत, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे.

Sanjay Raut: शेंडी ठेवली म्हणजे हिंदूत्व नाही, दाढी ठेवली म्हणजे इस्लाम नाही, संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
शेंडी ठेवली म्हणजे हिंदूत्व नाही, दाढी ठेवली म्हणजे इस्लाम नाही, संजय राऊतांचं ट्विट चर्चेतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 24, 2022 | 6:29 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर (bjp) टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. कधी मीडियाशी संवाद साधताना, कधी सभेतून तर कधी ट्विटरवरील शेरोशायरीतून राऊत सातत्याने भाजपला हिंदुत्वाच्या (hindutva) मुद्द्यावरून डिवचतना दिसत आहेत. भाजपचं हिंदुत्व किती बेगडी आहे आणि शिवसेनेचं हिंदुत्व राष्ट्रवादाशी कसं जोडलेलं आहे, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्याही ते सातत्याने मांडत असतात. त्यामुळे भाजपकडूनही त्यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातं. आजही त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. प्रसिद्ध शायर काजी नजरुल इस्लाम यांचा एक शेर ट्विट करत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

काय आहे ट्विट?

संजय राऊत यांनी आज ट्विट केलेल्या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. मै हिंदुओं और मुसलमानों को, बर्दाश्त कर सकता हूँ, लेकिन चोटीवालों और दाढीवालों को नहीं! चोटी हिंदुत्व नही है, दाढी इस्लाम नही है, असा शेर राऊत यांनी शेअर केला आहे. मी हिंदू आणि मुस्लिमांना सहन करू शकतो. पण शेंडी आणि दाढी राखणाऱ्या कट्टरतावाद्यांना सहन करू शकत नाही. कारण शेंडी ठेवली म्हणजे हिंदू ठरत नाही आणि दाढी ठेवली म्हणजे इस्लामी झालं असं होत नाही, असं या शेरमधून राऊत यांना सूचवायचे आहे.

बाळासाहेबांचं हिंदुत्व नेमकं काय?

शिवसेना प्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची साधी सोपी आणि सुटसुटीत व्याख्या केली होती. माझं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. मंदिरात घंटा बडवणारे हिंदू नकोत. अतिरेक्यांचा खात्मा करणारे हिंदू मला हवे आहेत, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाला धर्माशी जोडलं नव्हतं. त्यांनी हिंदुत्वाचा संबंध थेट राष्ट्रीयत्वाशी जोडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणात हाच दाखला देत भाजची कोंडी करत असतात.

गदाधारी ते गधाधारी…

आपलं हिंदुत्व गदाधारी तर इतरांची घंटा धारी. बसवा हलवत घंटा, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करताना शिवसेनेचं हिंदुत्व गधाधारी असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तरही दिलं होतं. आमचं हिंदुत्व गधाधारी असं फडणवीस म्हणाले. तो गधा आम्ही अडीच वर्षापूर्वी सोडून दिला. आम्ही गाढव सोडून दिलं. घोड्याच्या आवेशात होते, त्या गाढवाने लाथ मारण्यापूर्वीच आम्ही सोडून दिलं, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.