AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना पॉझिटिव्ह सहा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांकडून यादी जाहीर

मुंबईतून गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह असलेले सहा मृतदेह गायब  (six dead bodies of COVID patients missing ) झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह सहा मृतदेह गायब, किरीट सोमय्यांकडून यादी जाहीर
| Updated on: Jun 09, 2020 | 2:28 PM
Share

मुंबई : मुंबईतून गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह असलेले सहा मृतदेह गायब  (six dead bodies of COVID patients missing ) झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाच्या नातेवाईकांनी आणि किरीट सोमय्या यांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारीनंतर काही मृतदेह सापडले आहेत.

मुंबईत सध्या कोरोनाचा कहर आहे. मोठ्या संख्येने लोकांना याचा संसर्ग होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यावेळी सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अनेक मृतदेह गायब होत आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर ते सापडतही आहेत. आतापर्यंत मुंबईतील विविध रुग्णालयातून 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मृतदेह गायब झाल्याची यादी सोमय्यांनी सादर केली. (six dead bodies of COVID patients missing )

सोमय्यांच्या मते, राकेश वर्मा या 45 वर्षीय व्यक्तीचा जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेन्टर येथून मृतदेह गायब झाला होता. तर सुधाकर खाडे यांचा केईएम हॉस्पिटलमधून मृतदेह गायब झाला होता. नंतर तो शवागृहात सापडला. याशिवाय जानकीदेवी विश्वकर्मा यांचा मृतदेह सायन हॉस्पिटलमधून गायब झाला होता. तर मधुकर पवार यांचा मृतदेह नायर हॉस्पिटलमधून गायब झाला होता. विठ्ठल मुळे यांचाही मृतदेह गायब झाला होता. तो काल बोरिवली स्टेशनजवळ सापडला. तिकडे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एकाचा खून झाला आहे. त्याचाही मृतदेह राजावाडी हॉस्पिटलमधून गायब झाला आहे.

80 वर्षीय बेपत्ता रुग्णाचा मृतदेह सापडला 

मुंबई महापालिका रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा मृतदेह चक्क बोरिवली स्टेशनजवळ सापडला. (Shatabdi Hospital missing corona patient found dead) रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धचा थेट मृतदेहच सापडल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय यानिमित्ताने मोठा प्रश्न हा आहे की, रुग्णालयातून हे आजोबा बोरिवली स्टेशनपर्यंत पोहोचलेच कसे? विठ्ठल मुळे असं मृत वृद्धाचं नाव आहे.

संबंधित बातम्या 

शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोना रुग्ण बेपत्ता, मृतदेह बोरिवली स्टेशनजवळ सापडला

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.