AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेकडून माझ्यावर भेदभाव; सोनू सूदचा न्यायालयात दावा

मला नोटीस देताना मुंबई महानगरपालिकेने कथित अनधिकृत बांधकामाचा कोणताही तपसशील दिलेला नाही," असे म्हणत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मुंबई महापालिकेने त्याच्यावर भेदभाव केल्याचा दावा न्यायालयात केला. (Sonu Sood on Juhu hotel)

मुंबई महापालिकेकडून माझ्यावर भेदभाव; सोनू सूदचा न्यायालयात दावा
| Updated on: Jan 13, 2021 | 3:18 PM
Share

मुंबई : “कोणतीही नोटीस देताना त्यावर मुदत आणि इतर माहिती स्पष्टपणे दिली जाते. मात्र, मुंबई महानगरपालिनेने दिलेली नोटीस ही अगदीच अस्पष्ट स्वरुपातील आहे. तसेच, मला नोटीस देताना मुंबई महानगरपालिकेने कथित अनधिकृत बांधकामाचा कोणताही तपसशील दिलेला नाही,” असे म्हणत बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मुंबई महापालिकेने त्याच्यावर भेदभाव केल्याचा दावा न्यायालयात केला. सोनू सूदने त्याच्या जुहू येथील 6 मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचे म्हणत पोलिकेने सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीविरोधात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (13 जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सोनू सूदने वरील दावा केला. (Sonu Sood said that his hotel is not illegal he has notmade any change in his building)

इमारतीची खिडकीसुद्धा तोडली नाही

यावेळी न्यायालयात आपली बाजू मांडताना सोनू सूदने त्याने शक्तीनगर येथील इमारतीत कोणताही बदल केला नसल्याचे सांगितले. तसेच शक्तीनगरमधील इमारतीतील खिडकीसुद्धा तोडली नसल्याचे सोनू सूदने म्हटलंय. “ती इमारत 1992 साली बांधण्यात आली होती. 2018-19 मध्ये मी तिला विकत घेतलं. या इमारतीचे सर्व कागदपत्रं माझ्याकडे आहेत. ही इमारत जेव्हापासून मी घेतलेली आहे; तेव्हापासून या इमारतीची खिडकीसुद्धा मी तोडलेली नाही,” असा दावा सोनू सूदने न्यायालयात केला. तसेच पालिकेने नोटीस देताना, ती अगदीच अस्पष्ट स्वरुपात होती. त्या नोटिशीवर सविस्तर तपशीलही दिलेला नव्हता. पालिकेने माझ्यासोबत भेदभाव केल्याचंही त्यांने न्यायालयात सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

सोनू सूदची जुहूमधील शक्तीनगरात एक हॉटेल आहे. कुठलीही परवानगी न घेता सोनू सूदने या इमारतीचे हॉटेमध्ये रुपांतर केल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे. त्यासाठी बिएमसीने सोनू सूदला नोटीसही दिली होती. मात्र, तरीदेखील सोनू सूदने या इमारतीचे बांधकाम सुरुच ठेवल्याचा आरोप करत पालिकेने सोनू सूदविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर सोनू सूदने उच्च न्यायालयात धाव घेत महापालिकेच्या तक्रारीविरोधात याचिका दाखल केली. याच याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी सुनावणीमध्ये त्याने इमारतीत कोणाताही बदल केला नसल्याचे सांगत महापालिकेने त्याच्यावर अन्याय केल्याचं सोनू सूदने म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Sonu Sood Vs BMC | अभिनेता सोनू सूदची BMC विरोधात याचिका, कोर्टाच्या सुनावणीकडे चाहत्यांचं लक्ष!

Special Story : सोनू सूदला अनधिकृत बांधकाम भोवणार?; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरणं?

Sonu Sood | अभिनेता ‘सोनू सूद’ राजकीय आखाड्यात उतरुन शड्डू ठोकणार!

(Sonu Sood said that his hotel is not illegal he has notmade any change in his building)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.