St Workers Agitation : शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनाचा भाजपकडून निषेध, फडणवीसांपासून ते शेलारांपर्यंत नेते म्हणतात…

गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली आहे.

St Workers Agitation : शरद पवारांच्या घरावर झालेल्या आंदोलनाचा भाजपकडून निषेध, फडणवीसांपासून ते शेलारांपर्यंत नेते म्हणतात...
भाजप नेत्यांकडून आंदोलनाचा निषेधImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 7:58 PM

मुंबई : आज एसटी कर्मचाऱ्यांनी (St Workers Agitation) जे शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर जोरदार आंदोलन केले त्याचा भाजप नेत्यांनी निषेध केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली आहे. तर इतर भाजप नेत्यांनीही या आंदोलनाच्या निषेध करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीसांचं ट्विट

आशिष शेलार यांच्याकडूनही निषेध

भाजप नेते आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आज ज्या पध्दतीने आंदोलन करण्यात आले ते अयोग्य, चुकीचे व असमर्थनीय आहे. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. सदर घटनेबाबत माहिती जेव्हा टीव्हीवर दिसताच मी तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दूरध्वनीवर संपर्क साधला . त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही पण स्विय सहाय्यकाशी बोलणे झाले. सदर घटना घडत असताना घराच्या परिसरात पोलीसांची संख्या कमी होती हे लक्षात आणून देत तात्काळ पोलीस बळ वाढवण्यात यावी अशी विनंती केली, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकूण घ्याव्या

दरम्यान, गेल्या 5 महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या मागण्या सरकारने योग्य पध्दतीने ऐकून घ्यायला हव्यात. त्यातून मार्ग काढणे अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. इथून पुढे देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत देखील राज्य सरकार सकारात्मक असणार आहे. काल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन राज्य सरकार करणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला मग आज हे आंदोलन करण्याची गरज काय असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

ST Andolan Mumbai : ‘महाराष्ट्राचं राजकारण इतकं घाणेरडं कधीही नव्हतं, चौकशी करुन कठोर कारवाई होणार’, आदित्य ठाकरेंचा इशारा

ST Andolan Mumbai: ज्या भाषणामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले, तो अ‍ॅड. सदावर्तेंचा बाईट ऐका

Chandrakant Patil : मुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेचा हिंदुत्वाचा आधार संपविण्याचे कारस्थान, चंद्रकांत पाटलांचा पुन्हा गौप्यस्फोट

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.