AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Parab on st bus workers strike : वेतनवाढ दिल्यानंतरही कामगार संपावर ठाम असतील तर दिलेल्या पगारवाढीचाही विचार करावा लागेल; अनिल परब यांचा इशारा

आज 500 रोजंदारी कर्मचाऱ्याचा सेवा समाप्तीचा निर्णय घेतला आहे. संपाचा तिढा कायम राहिला तर पर्याय म्हणून मागच्या काही दिवसात निवड झालेल्यांबद्दल विचार करावा लागेल, असेही परब यांनी सांगितले.

Anil Parab on st bus workers strike : वेतनवाढ दिल्यानंतरही कामगार संपावर ठाम असतील तर दिलेल्या पगारवाढीचाही विचार करावा लागेल; अनिल परब यांचा इशारा
एसटी संप, अनिल परब
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 8:41 PM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देऊन संप मागे घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी विलिनीकरणाचा मुद्दा उचलून धरत संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे अनिल परब यांनी आज कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. वेतनवाढ दिल्यानंतरही कामगार संपावर ठाम असतील तर दिलेल्या पगारवाढीचाही विचार करावा लागेल; असे अनिल परब यांनी म्हटले आहे.

पैसे देऊन संप चालू आहे मग पैसे न देता संप चालू राहण्यात काय वाईट

राज्य सरकारने तोडगा काढून पगारवाढ केली. अनेक कामगारांनी कामावर येण्याची इच्छा व्यक्त केली, रुजूही झाले. एसटी संघटना कृती समिती यांच्याशी चर्चा झाली. त्यांना दिलेली पगारवाढ ही मूळ वेतनात दिलेली असल्याने त्यांच्या श्रेणीत तफावत निर्माण झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. संप मिटल्यावर यावर विचार करता येईल कोणावरही अन्याय होणार नाही. पण बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही ही सुद्धा जाणीव त्यांना करून दिली.

सातवा वेतन आयोग लागू करावा, 10 वर्षांचा करार करावा अशी मागणी आली, त्यावरही विचार करू. हा करार खरं तर 4 वर्षांचा असतो मात्र 10 वर्षांच्या करारावर नक्कीच विचार करू. मात्र तोपर्यंत एसटी बंद ठेवणं ना कर्मचाऱ्यांना ना सरकारला ना प्रवाशांना परवडणारे आहे. पैसे देऊन संप चालू आहे मग पैसे न देता संप चालू राहण्यात काय वाईट, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

आज 500 रोजंदारी कर्मचाऱ्याचा सेवा समाप्तीचा निर्णय घेतला

कारवाईवर कामगारांचे निरोप येत आहेत. अजून एक दिवस वेळ द्यावा, आम्ही कामावर येऊ इच्छितो. ज्या कामगारांना उद्या कामावर यायचंय त्यांना परवानगी देऊ असं आम्ही आज रात्री बसून बैठक घेऊ आणि निर्णय घेऊ. पण यानंतर कठोर कारवाई करावी लागेल, असे अनिल परब यांनी सांगितले. कारवाई रोज सुरू आहे. आज 500 रोजंदारी कर्मचाऱ्याचा सेवा समाप्तीचा निर्णय घेतला आहे. संपाचा तिढा कायम राहिला तर पर्याय म्हणून मागच्या काही दिवसात निवड झालेल्यांबद्दल विचार करावा लागेल, असेही परब यांनी सांगितले. (State transport minister Anil Parab warning st worker regarding salary hike)

संबंधित बातम्या

Anil Parab on st bus workers strike : पैसे देऊन संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट, आता सरकारला विचार करावाच लागेल; परब यांचा इशारा

Anil Parab on ST bus workers strike : सातवा वेतन आयोग आणि 10 वर्षाचा करार यावर विचार होऊ शकतो, पण संप मागे घ्या; अनिल परब यांची मोठी घोषणा

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.