“कोरोनाची आज दुसरी लाट, उद्या तिसरी येईल, म्हणूनच जीवनशैलीत बदल करा,” मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आपल्या  जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केले. (corona pandemic uddhav thackeray)

कोरोनाची आज दुसरी लाट, उद्या तिसरी येईल, म्हणूनच जीवनशैलीत बदल करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
UDDHAV THACKERAY CORONA
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 8:06 PM

मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपल्याला या संकटाला सामोरे जायचे आहे. त्यामुळे  कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत. आज कोरोनाची दुसरी लाट आहे. उद्या तिसरी लाट येईल. त्यामुळे आपल्या  जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  केले. आज त्यांची डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख  मुख्य सचिव सीतराम कुंटे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (strict rule have to follow have to adapt ourselves to handle Corona pandemic said Uddhav Thackeray)

कामगारांना शक्य असेल तर घरूनच काम द्या

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्गावर विस्तृत भाष्य केले.” संकटाची चिंता नाही. पण या संकटाला सामोरे जातांना सहकार्य करणाऱ्या मित्रांची नक्कीच गरज आहे. कोरोनाचे आव्हान मोठे आहे. त्यामुळे उद्योग व्यवसाय आणि व्यापार करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की  आपल्या सर्वच कामगारांना एकाच शिफ्टमध्ये न बोलवता ज्यांना घरी राहून काम करणे शक्य आहे त्यांना ते करू दिले पाहिजे. ज्यांना कारखान्याच्या आवारात यायचे त्यांच्या शिफ्ट लावल्या पाहिजेत,” असे ते म्हणाले.

लस घेतली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळा

तसेच कोरोनाची आज दुसरी लाट आहे, उद्या कदाचित तिसरी येईल. आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल तर कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. त्यासाठी काही कडक निर्बंधांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी मास्क व्यवस्थित लावणे, हातांची स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे आणि दो गज की दूरी राखणे आवश्यक आहे. ज्या कारखानदारांना त्यांच्या कारखान्याच्या जागेत काही कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे; त्यांनी कारखान्याच्या आवारातच कामगारांची  राहण्याची व्यवस्था करावी. त्यांचे टेस्टींग, लसीकरण याकडे लक्ष दिले जावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कडक निर्बंध गरजेचे

पुढे बोलताना, राज्यात फेब्रुवारी 2021 पर्यंत परिस्थिती ठीक झाली होती. परंतु कोरोनाचा नवा विषाणू असा आहे जो वेगाने पसरतो आहे.  त्याला थांबवायचे असेल तर काही कडक निर्बंध आवश्यकच आहेत. आजही  75 ते 80 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यांना त्रासही होत नाही परंतू ते इतरांना बाधित करू शकतात. कोरोनाचा प्रसार करू शकतात. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.  ज्वेलरी पार्कच्या प्रस्तावास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील तसेच डायमंड असोसिएशनने  स्टॅम्प ड्युटी किंवा इतर ज्या मागण्या मांडल्या त्याचा ही शासन गांभीर्याने ‍विचार करील असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर; वाचा, संपूर्ण नियमावली, काय सुरु, काय बंद?

Pune Weekend lockdown guidelines : पुण्यात वीकेंड लॉकडाऊनचे नियम, मेडिकल-दूध वगळता सर्व बंद

(strict rule have to follow have to adapt ourselves to handle Corona pandemic said Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.