मराठा आंदोलकांचं उपोषण मागे, महाजनांच्या शिष्टाईला यश

पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : गेल्या सोळा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले होते. आतापर्यंत विरोधक या आंदोलकांना भेटून गेले होते. मात्र अखेर आज राज्य सरकारकडून शिष्टाई करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानत पोहोचले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. महाजनांची शिष्टाई कामाला आली असून, उपोषणकर्त्यांनी […]

मराठा आंदोलकांचं उपोषण मागे, महाजनांच्या शिष्टाईला यश
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:00 PM

पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : गेल्या सोळा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले होते. आतापर्यंत विरोधक या आंदोलकांना भेटून गेले होते. मात्र अखेर आज राज्य सरकारकडून शिष्टाई करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानत पोहोचले होते. त्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. महाजनांची शिष्टाई कामाला आली असून, उपोषणकर्त्यांनी सोळा दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

गिरीश महाजनांसोबत चर्चेत काय ठरलं?

  • मराठा समजाची जी प्रमुख मागणी आहे, ती म्हणजे आरक्षणाची. ती प्रमुख मागणीच आता मार्गी लागली असून, त्यावर लवकरच निर्णय होईल, असे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.
  • आझाद मैदानातील मराठा उपोषणकर्त्यांनी गिरीश महाजनांकडे प्रामुख्याने ‘सारथी’चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर, डॉ. सदानंद मोरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर अधिवेशनात निर्णय जाहीर केला जाईल, असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले.
  • डॉ. सदानंद मोरे यांनी दोन ते तीन दिवसात चर्चेसाठी बोलावले जाईल, त्यांच्याशी चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल व तो अधिवेशनात सांगितला जाईल, असे गिरीश महाजन यांनी मराठा उपोषणकर्त्यांना सांगितले.
  • मराठा ठोक मोर्चादरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात आझाद मैदानातील मराठा उपोषणकर्त्यांनी महाजनांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक असून, लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरु केली जाईल.
  • तसेच, यावेळी कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी देण्याबाबत उपोषणकर्त्यांनी विचारले असता, कोपर्डीचा विषय कोर्टात आहे, त्यामुळे त्यासाठी थांबावं लागेल, असे महाजनांनी सांगितले. महाजनांचे हे म्हणणे उपोषणकर्त्यांना सुद्धा मान्य झाले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले?

“मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलंय, सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आणि ते उपोषणकर्त्यांनी मान्य केले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतोय, उपोषणकर्त्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत, काही तांत्रिकरित्या अडकल्या आहेत, त्यांना गती द्यावी लागणार आहे, येत्या 15 दिवसात सर्व मागण्यांवर चर्चा करु.” – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

उपोषणकर्ते संभाजी पाटील काय म्हणाले?

“आमच्या मागण्या अधिवेशनादरम्यान पूर्ण होतील अशी आशा आहे, त्यामुळे आमचं उपोषण मागे घेतोय. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, दगाबाजी झाल्यास, उद्रेक होईल, त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गिरीश महाजनांची असेल. आमच्या मागण्या आहेत, त्याबाबत जीआर काढून लागू व्हाव्यात, त्या मान्य न झाल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलन करु.” – मराठा उपोषणकर्ते संभाजी पाटील

दगाबाजी झाल्यास उद्रेक निश्चित!

मराठा आरक्षणासाठी गेल्या सोळा दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसेलल्या संभाजी पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. उपोषण सोडताना गिरीश महाजन यांनी आरक्षण आणि इतर मुद्द्यांबाबत जी आश्वासनं दिली आहेत, ती पूर्ण न झाल्यास किंवा काही दगाबाजी झाल्यास उद्रेक होईल आणि त्यापुढील जबाबदारी गिरीश महाजनांची असेल, असा इशारा संभाजी पाटील यांनी दिली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें