
Maharashtra Cabinet Reshuffle: दिवंगत अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या हेविवेट नेत्यांनी दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्का झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. गेल्या सव्वा तासापासून ही बैठक सुरू होती. ही बैठक संपली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्याचे समजते. तर अजितदादांची सर्व खाती ही राष्ट्रवादी पक्षालाच देण्यात यावी असंही सांगण्यात आल्याचे समजते. अजितदादांच्या खात्याबाबत लवकरात लवकर निर्णय करायचा आहे, असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
पवार कुटुंब चर्चा करेल
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांच्या रूपाने महाराष्ट्राने अतिशय कर्तृत्ववान नेता गमावला याच दुःख आहे. कालच दादांचा अंत्यविधी झाला. आज अनेक बातम्या समोर येत आहेत की कोण मंत्री आणि उपमुख्यमंत्री बनणार म्हणून. नुकतीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. शरद पवार,सुनेत्रा पवार, पार्थ, जय हे पवार कुटुंब एक दोन दिवसात एकत्र बसतील आणि संपूर्ण पवार परिवार याविषयी चर्चा करतील. त्याच नंतर कळेल काय करायचं ते, असे अनिल देशमुख म्हणाले.
अजित पवार यांची मनापासून इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे. आम्ही सर्व नेते आणि जयंत पाटील यांच्याशी बैठक झाल्या. त्यांनी सांगितलं होत की महापालिका निवडणुका झाल्या की लवकर निर्णय घेऊ पण जिल्हा परिषद लागल्या पण त्यांच्या सगळ्या नेत्यांना त्यांनी सांगितलं होत. पण त्यांची ही मनापासून इच्छा होती. त्याची ही शेवटची इच्छा होती त्या दृष्टीने पाऊले उचलले गेली पाहिजे. स्वतः अजित पवार यांनी देखील बोलताना सांगितलं त्यावेळी त्यांनी पण सांगितलं की तुमच्या तोंडांत साखर पडो याचा अर्थ काय ते तुम्ही बघा. वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
या क्षणी असा विचार करणे कठीण?
राष्ट्रवादीचे नेते हे कोणता विषय घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, हे मला माहित नाही. आम्ही काल पवार परिवाराला भेटायला गेलो होतो. जल अंत्यविधी झाला, त्याच दिवशी अशा बैठका होतील का? असा सवाल त्यांनी केला. याक्षणी कोण मंत्री आणि उपमुख्यमंत्री होणार हा विचार करणं आमच्यासाठी कठीण आहे. फायदाच असल्याने तशी पाऊले अजित पवार यांनी उचलली होती. त्यांची इच्छा होती तसंच झालं पाहिजे असा वाटतं. अशा पद्धतीने त्यांच्या गटात चर्चा सुरू आहे असा काही कानावर नाही. महापालिका निवडणुका झाल्यावर एकत्र यायचं ठरवलं पण जिल्हा परिषदेमुळे पुढे गेले. दोन्ही राष्ट्रवादींची एकत्रिकरणाची अजितदादांची अंतिम इच्छा होती, त्यादृष्टीने पावलं टाकायला हवी असे देशमुख म्हणाले.