AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही हल्ले झाले… काहीही घडलं तरी… सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?

नेत्रा पवार यांनी मुंबईच्या अविचल स्पिरीटचे कौतुक केले, की कितीही संकटे आली तरी मुंबई थांबत नाही. टाटा मॅरेथॉननिमित्त बोलताना त्यांनी मुंबईची लवचिकता, धावपटूंचे स्वप्न आणि फिटनेसचे महत्त्व अधोरेखित केले. मुंबई नेहमीच धावते, हीच तिची खरी ओळख असून, जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या मॅरेथॉनसाठी तयारी सुरू आहे, असे त्या म्हणाल्या.

कितीही हल्ले झाले... काहीही घडलं तरी... सुनेत्रा पवार असं का म्हणाल्या?
Sunetra PawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 10:44 AM
Share

मुंबईत कितीही हल्ले झाले, काहीही घटना घडल्या तरी मुंबई थांबत नाही. मुंबई झुकत नाही आणि हारतही नाही. मुंबई नेहमीच चालत राहते. पळत राहते, असं गौरवौद्गार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढलं आहे. टाटा मॅरेथॉनच्या निमित्ताने मीडियाशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी मुंबईच्या स्पिरीटला सलाम केला. मुंबईची खासियत, मुंबईचं वेगळपण आणि मुंबईची महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं. तसेच टाटा मॅरेथॉनमध्ये धावण्याचं स्वप्न घेऊनच प्रत्येकजण येत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टाटा समूहाचं मुंबईत मोठं योगदान राहिलं आहे. हे सर्वांना माहीत आहे. तसेच सर्वांना मुंबईची खासियतही माहीत आहे. काहीही घडलं तरी मुंबई कधीच थांबत नाही. मुंबई नेहमीच धावत राहते. मुंबई पळत राहते. हीच मुंबईची खासियत आहे. टाटा मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रत्येक रनर हे स्वप्न घेऊनच आलेला असतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या कारणाने स्पर्धेत भाग घेतो. प्रत्येकाची कारणं वागेळी असतात. दिव्यांगही धावत असतात. प्रत्येकजण आपआपलं स्वप्न घेऊनच पळत असतात. प्रत्येकजण स्वप्न घेऊन धावत असतात, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

फिटनेसचा कानमंत्र

सुनेत्रा पवार यांनी यावेळी फिटनेसचा मंत्रही दिला. फिटनेसची जागृती असली पाहिजे. फिटनेस महत्त्वाची आहे. कोविड नंतर आपल्याला फिटनेसचं पुन्हा एकदा महत्त्व कळालं आहे. अनादी काळापासून योगाचं महत्त्व राहिलंच आहे. त्यामुळे प्रत्येकाने फिट राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरोग्य टिकवून ठेवलं पाहिजे, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

मुंबईत टाटा मॅरेथॉन कधी?

मुंबईत पुढच्या वर्षीची टाटा मॅरेथॉन येत्या 17 जानेवारी 2027 रोजी होणरा आहे. फूल, हाफ, ओपन, ड्रीम रन, सीनियर सिटीजन रम आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी अशा कॅटेगिरीमध्ये ही मॅरेथॉन होत असते. या मॅरेथॉनसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये देशभरातील रनर भाग घेत असतात. शिवाय विदेशातूनही रनर या स्पर्धेत भाग घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे ही स्पर्धा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Follow Us
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...