सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया

सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दीड महिन्याच्या कोरोना पॉझिटीव्ह बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली (Mumbai Sion Hospital).

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया
चेतन पाटील

|

May 21, 2020 | 5:06 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सायन रुग्णालयातील (Mumbai Sion Hospital) दुरवस्था दाखणारे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र, त्याच सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता दीड महिन्याच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. सायन रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतानाही तो धोका स्वीकारुन डॉक्टरांनी दीड महिन्याच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावर शस्त्रक्रिया केली (Mumbai Sion Hospital).

कोरोनाबाधित बाळाच्या मेंदूतून रक्तस्त्राव सुरु होता. मेंदूच्या डाव्या बाजूला रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यामुळे तात्काळ सर्जरी करण्याची गरज होती. बाळाच्या प्रकृतीचं गांभीर्य लक्षात घेऊन सायन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मध्यरात्री 2 वाजता बाळावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे हे बाळ आता धोक्याबाहेर आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित बाळावर शस्त्रक्रिया केल्यामुळे डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही डॉक्टर क्वारंटाईनमध्ये आहेत. याप्रकरणी पेडियाट्रिक विभागाच्या प्राध्यापिक डॉ. मोना गजरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे.

“हे बाळ सायन रुग्णालयात 13 मे रोजी दाखलं झालं होतं. तेव्हा बाळ 1 महिने 5 दिवसांचं होतं. बाळाचं वजन दोन किलो होतं. या बाळाला सर्दी, खोकला आणि ताप होता. याशिवाय बाळाला वारंवार फिट येत होती. बाळाची टाळू सुजली होती. सुरुवातीला बाळाच्या मेंदूत काही इन्फेक्शन झालं असेल असा अंदाज वर्तवला गेला. त्यामुळे त्याचं सिटीस्कॅन करण्यात आलं”, असं डॉ. मोना गजरे यांनी सांगितलं.

“सिटीस्कॅनमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. या बाळाच्या मेंदूच्या एका बाजूला रक्ताची गाठ तयार झाली होती. ही बाब समोर येताच तातडीने न्यूरो सर्जन टीमने एकत्र येऊन सर्जरी करुन ती गाठ काढली. आता बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असून लवकरच ते बरं होईल”, अशी माहिती डॉ. मोना गजरे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

एकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने बळी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें