AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस एका ताटात जेवले तरी…; ठाकरे गटाच्या महिला नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

Sushma Andhare on Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Lift Journey : ठाकरे गटाच्या महिला नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस एका ताटात जेवले तरी...; ठाकरे गटाच्या महिला नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 27, 2024 | 1:59 PM
Share

आज विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. सभागृहात जात असताना या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला. यावर शिवसेना ठाकरे गटाच्य नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवसाहेब ठाकरे यांना एका ताटात जरी घेऊन देवेंद्र फडणवीस जेवले. तरी आम्ही देवेंद्र फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे. म्हणजे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. या भेटीचा वेगळा असा काही अर्थ नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाहीत. त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले. पण याचा अर्थ लगेच ते एकत्र आले असं होत नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

चंद्रकांत पाटलांना चिमटा

चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला विश्वासघाताचे विषारी घोट पाजले आहेत. हे विश्वासघाताचे विषारी घोट सुद्धा पचवून आम्ही परत उभा राहिलो आहे. माध्यमांच्या समोर जरी चंद्रकांत पाटील यांनी चॉकलेट दिले असले तरी आमची विनंती आहे की, तुम्ही जनतेला आश्वासनांचे चॉकलेट देऊ नका. तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

‘मेरा यार, मेरा दुश्मन’ हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या. याचा या भेटीचा काहीही परिणाम होणार नाही. वर्धापन दिनादिवशी उद्धव साहेब ठाकरे यांनी भूमिला स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ साहेबांनाबाबत सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे. कुठली चर्चा झाली नाही. आम्ही कुणासोबत जाणार नाही म्हणजे जाणार नाही, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ‘लिफ्ट’ भेट

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सभागृहात जाण्यासाठी विधिमंडळातील लिफ्टजवळ उभे होते. याचवेळी त्या लिफ्टजवळ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर पोहोचले. मग हे सगळे नेते एकत्र लिफ्टने सभागृहात जाण्यासाठी निघाले. उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस हे लिफ्टमध्ये गेले. इतक्यात भाजपचे नेते प्रविण दरेकर हे त्या लिफ्टमध्ये जाऊ लागले. मात्र इतक्यात ‘याला आधी बाहेर काढा’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा